आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sachin Vaze Antilia Case News And Updates: Mukesh Ambani Antilia Security Mansukh Hiren Murder Case Update | National Investigation Agency, Mumabi Police Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरणात नवा खुलासा:सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या स्कॉर्पियोमधून जप्त केलेल्या जिलेटिनच्या कांड्या, काळ्या रंगाची एक ऑडीही या प्रकरणात जप्त

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिलेटिनच्या कांड्यावर नोंदलेल्या नावाच्या आधारे NIA लवकरच कंपनीच्या लोकांशी संपर्क साधून चौकशी करू शकते.

अँटिलियाच्या बाहेर उभ्या स्कॉर्पियोमधून ज्या 20 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्या कांड्या या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याची पुष्टी केली आहे. या कांड्या कधी व कोठून खरेदी करण्यात आल्या याचे NIA ने स्पष्टीकरण दिले नाही. या कांड्या नागपूरच्या ‘सोलर इंडस्ट्रीज’ नावाच्या कंपनीत तयार केल्याचे तपासात समोर आले होते.

जिलेटिनच्या कांड्यावर नोंदलेल्या नावाच्या आधारे NIA लवकरच कंपनीच्या लोकांशी संपर्क साधून चौकशी करू शकते. यापूर्वी या कंपनीच्या मालकाचा जबाब नागपूर पोलिसांनी नोंदवला होता. जप्त केलेल्या कांड्यांवर कोणताही अनुक्रमांक नव्हता, परंतु NIA ने ज्या कांड्या काढल्या आहेत त्याच्या बॉक्सचा शोध घेतला तर या कांड्या कधी खरेदी केल्या आणि कुणी विकल्या याचा शोध लागू शकतो. प्रत्येक बॉक्सवर एक विशेष क्यूआर कोड असतो, ज्याचा रेकॉर्ड कंपनी जवळ असतो.

ही कार सचिन वाझेच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती.
ही कार सचिन वाझेच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती.

या प्रकरणात 8 वी कार ताब्यात
अँटिलिया प्रकरणात अखेर एनआयएने 8 वी कार जप्त केली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएची टीम सचिन वाझेच्या नावावर रजिस्टर्ड असलेली काळ्या रंगाची ऑडी कार (MH04 FZ6561) शोधत होती. मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये या कारची भूमिका काय आहे आणि ती कोणी वापरली? एनआयए सध्या त्याचा तपास करत आहे. एनआयएला शंका आहे की सचिन वाझेने ही ऑडी कार मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या आधी वापरली होती.

अजूनही एका स्कोडा कारचा शोध
यापूर्वी एटीएसनेही एनआयएला सोपवलेल्या तपास अहवालात सचिन वाझेद्वारे एक ऑडी कारचा वापर केल्याची माहिती दिली होती. एनआयएला अजुनही एका स्कोडा कारचा शोध घेत आहे.

कारतारीख
स्कॉर्पियो25 फेब्रुवारी (यामध्ये मिळाले होते स्फोटके)
इनोव्हा15 मार्च (सचिन वाझे या सरकारी इनोव्हामधून स्कॉर्पिओचा पाठलाग करत होता)
ब्लॅक मर्सिडीज16 मार्च (मुंबईमध्ये पोलिस गॅरेजमध्ये लपवण्यात आली होती)
ब्लू मर्सिडीज18 मार्च( क्राफर्ड मार्केटमधून जप्त करण्यात आली होती)
लँड क्रूजर प्राडो18 मार्च (ठाण्यातून एक लँड क्रुजरही जप्त करण्यात आली होती)
वॉल्वो22 मार्च (महाराष्ट्र ATS ने दमन येथून ही कार जप्त केली)
आउटलँडर30 मार्च (नवी मुंबईच्या कामोठे क्षेत्रातून जप्त केली.)

मिलिंद काथेंकडे CIU ची सूत्रे
सचिन वाझे यांचे निलंबन झाल्यानंतर त्याच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान आता सचिन वाझेच्या जागी मिलिंद काथे यांना CIUच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद मधुकर काथे हे गुन्हे शाखेच्या कक्ष 2 चे निरिक्षक होते. त्यांना सध्या प्रभारी म्हणून नियुक्ती केले आहे.

बातम्या आणखी आहेत...