आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन वाझेला 3 एप्रिलपर्यंत कोठडी:NIA चा दावा - सचिन वाझेच्या घरुन 62 काडतुसे सापडली, वाझे म्हणाले - 'मला बळीचा बकरा बनवले जातेय'

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • NIA ने आणखी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती

अँटिलिया प्रकरणात अटकेत असलेले API सचिन वाझेविषयी गुरुवारी NIA कोर्टात सुनावणी झाली. यावेळी NIA ने कोर्टात अनेक दावे केले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सांगितले की वाझेच्या घरातून 62 काडतुसे सापडली. पण काडतुसांचे तो काय करणार होता हे स्पष्ट झाले नाही. कोर्टाने त्याला 3 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली. NIA ने कोर्टाला असेही सांगितले की वाझेच्या एका सहकाऱ्याने सरकारी साक्षीदार होणे योग्य नाही. जेव्हा त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले जाते तेव्हा कोणत्याही व्यक्तीस सरकारी साक्षीदार बनवले जाते.

कोर्टात सुनावणीदरम्यान सचिन वाझे म्हणाला की ते राजकारणाचा बळी आहेत आणि या प्रकरणात त्याला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे. ते म्हणाले की या प्रकरणातील गुन्हा मी स्वीकारलेला नाही. या प्रकरणाची चौकशी मी 12 दिवस केली आणि त्यानंतर काही बदल झाले आणि मला NIA ने अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, कोर्टात त्याने कबूल केले की अँटिलिया प्रकरण सोडवून त्याला स्वतःला सुपरकॉप असल्याचे दाखवायचे होते.

NIA ने आणखी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती
सुनावणीदरम्यान NIA ने सचिन वाझेची आणखी 15 दिवस कस्टडी मागितली होती. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान NIA ने वाझे चौकशीत सहकार्य नसल्याचे सांगितले. NIA ने सांगितले की, DNA मॅच, रक्ताचे नमुने आणि CCTV यासह पुष्कळ पुरावे गोळा करण्यासाठी वाझेची आवश्यकता आहे. यामुळे त्यांना अजुन वाझेची कस्टडी हवी आहे. सुनावणीदरम्यान ASG अनिल सिंह म्हणाले की, ही देशातील एक अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणात, हाच पोलिस आरोपी आहे, जो या प्रकरणाचा तपास करत होता.

UAPA अंमलबजावणीवर वाझेच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला
सचिन वाझे यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील पोंडा यांनी युआयएपीच्या अंमलबजावणीच्या निर्णयाला एनआयएने कोर्टासमोर स्पष्टीकरण द्यावे, असा युक्तिवाद केला. हे प्रकरण यूएपीए अंतर्गत फिट होत नाही. फक्त जिलेटिन मिळवणे स्फोटकं मिळणे नाही.

NIA ला सचिन वाझेच्या घरुन मिळाले 62 जिवंत काडतुसे
न्यायालयात सुनावणी दरम्यान NIA ने म्हटले की, वाझेच्या घरात 62 जिवंत काडतुसे सापडली आहेत. ही काडदुसे घरात का ठेवली होती? याविषयी वाझेनी काहीच सांगितले नाही. NIA ने विशेष न्यायालयाला म्हटले की, वाझे अजुन काहीच उत्तर देत नाहीये, यामुळे अजुन चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...