आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात माजी API सचिन वाझेच्या पत्रानंतर एक नवीन वळण आले आहे. वाझेने यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्यावरही वसूलीसाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. वाझेच्या नवीन खुलास्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. भाजप आता समोर येऊन अनिल परबांसह मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागत आहे. वाझेने शनिवारी एका पत्रात म्हटले की, अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी त्याला वसूलीचे टार्गेट दिले होते.
वाझेच्या आरोपाने राज्य आणि पोलिस विभागाची प्रतिमा खराब झाली : फडणवीस
गुरुवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सचिन वाझेचे हे पत्र अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात 'दूध का दूध और पानी का पानी' व्हायला हवे. महाराष्ट्रात जे होत आहे, ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी योग्य नाही. CBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच याचे सत्य सर्वांसमोर येईल.
देशाच्या इतिहासात असे घाणेरडे राजकारण झाले नाही : संजय राऊत
या प्रकरणी आपला नेता आणि मंत्री अनिल परबांचा बचाव करत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'मी परबांना अनेक वर्षांपासून ओळखतो, ते किंवा कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊ शकत नाही' राऊत यांनी विरोधीपक्षावर घाणेरडे राजकारण करण्याचे आरोप लावत म्हटले की, 'देशाच्या इतिहासात असे घाणेरडे राजकारण कधीच झालेले नाही. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारला फसवण्यासाठी विरोधीपक्ष यशस्वी होणार नाही.' संजय राऊत म्हणाले की, ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.
लक्षात ठेवा तर कैदीही पत्र लिहू शकतात : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, तुरुंगात बंद असलेल्या लोकांकडून पत्र लिहून बदनामी करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनिल परबांवर आरोप करणारी व्यक्ती सध्या NIA च्या ताब्यात आहे. भाजपने याविषयी स्पष्टीकरण द्यायला हवे की, पत्र लिहणारा कोणताही संत किंवा महात्मा नाही. पुढे राऊत म्हणाले की, 'तुरुंगात अजुन काही लोकही आहेत जे पत्र लिहू शकतात, हे लक्षात ठेवायला हवे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.