आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणातील तपास जवळजवळ पूर्ण केल्यानंतर आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) आता जिलेटिनने भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपास वेगाने करत आहे. याच प्रकरणात 4 मार्चच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागले आहे. यात मुंबई पोलिसांचे निलंबित एपीआय सचिन वाझे हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाकडे जाताना दिसत आहे. NIA च्या तपासणीत असे दिसून आले आहे की 4 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता वाझे येथूनच लोकल पकडून ठाण्यात गेला होता.
CCTV व्हेरिफाय करण्यासाठी सीन रीक्रिएट केला
सोमवारी रात्री उशीरा NIA ची टीम सचिन वाझेला घेऊन CSMT स्टेशनवर पोहोचली आणि 4 मार्चचा सीन रीक्रिएट केला. टीमने CCTV फुटेजसोबतचे पुरावे जवळवण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर रेड टॅपिंग करुन वाझेंना चालवले. या दरम्यान पुण्यातील फॉरेंसिक टीमही येथे उपस्थित होती. सचिन वाझेच्या मूव्हमेंटला फॉरेंसिक टीमनेही रेकॉर्ड केले होते. याचे एनालिसिस करुन टीम एक दोन दिवसात आपला रिपोर्ट NIA ला सोपवणार आहे.
सचिन वाझेंनीच मनसुखला कॉल केला होता
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे हा 4 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता क्राइम इंटेलिजेंस युनिटच्या कार्यालयातून बाहेर पडला आणि सायंकाळी 7 वाजता सीएसएमटी स्थानकातल्या कॅन्टीन बाजूने प्रवेश केला. सुमारे तासाभरा नंतर तो रात्री 8.10 वाजता ठाण्यातील कालवा स्थानकावर पोहोचला. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझेनेच मनसुखला फोन केला होता आणि त्याच्या सांगण्यावरुनच मनसुख रात्री 9.20 वाजता मुंबईच्या भायखळा येथे पोहोचला होता.
अँटिलिया प्रकरणात एका स्पोर्ट्स बाइकची एंट्री
अँटिलिाय प्रकरणात NIA च्या हाती एक स्पोर्ट्स बाइक लागली आहे. ही बाइस सचिन वाझेची नीकवर्तीय मीना जॉर्जच्या नावावर रजिस्टर्ड आहे. मीनाला काही दिवसांपूर्वी NIA ने अटक केली होती. मीना तिच महिला आहे, जी नोटा मोजणारी मशीन घेऊन मुंबईच्या ट्राईडेंट हॉटेलमध्ये वाझेला भेटायला पोहोचली होती. CCTV फुटेजच्या आधारावर NIAला तिची माहिती मिळाली होती.
आतापर्यंत 8 कार आणि एक बाइक जप्त
NIA ला एक बाइक मिळाली आहे, ती इटालियन बेनेली कंपनीची आहे. या स्पोर्ट्स बाइकची किंमत जवळपास 7-8 लाख रुपये आहे. बाइकला सोमवारी एका टेंपोने NIA ऑफिसमध्ये आणण्यात आले. मनसुख प्रकरणात आतापर्यंत आठ लग्जरी कार आणि एक बाइ जप्त करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझेच्या चौकशीच्या आधारावर मुंबईच्या एका फ्लॅटमधून काही दस्तावेजही जब्त केले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
मुंबई पोलिसांना 25 फेब्रुवारीला संध्याकाळी जवळपास 3 वाजता जिलेटिनने भरलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओचे मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या बाहेर उभी सापडली होती. स्कॉर्पिओमध्ये एक धमकीचे पत्रही होते. CCTV फुटेजच्या तपासात समोर आले की, ही गाडी रात्री एक वाजता पार्क करण्यात आली होती. 5 मार्चला या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह कालवा येथील खाडीमध्ये आढळला होता. पोलिसांनी पहिले ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते आणि नंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण विधानसभेत उचलून धरल्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास ATS ला सोपवला.
ATS ने यामध्ये हत्येचा गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणात माजी कॉन्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरेला अटक केली. यानंतर NIA ने न्यायालयाच्या माध्यमातून ही केस ATS कडून आपल्या हातात घेतली आणि आता या प्रकरणाचा तपास NIA करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.