आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:परमबीर सिंह NIA च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले, द्यावी लागू शकतात या 7 प्रश्नांची उत्तरे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझेच्या सीक्रेट पार्टनरची सीक्रेट डायरी मिळाली

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA)ची चौकशी सुरूच आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह चौकशीसाठी NIA कार्यालयात पोहोचले आहेत. याच प्रकरणात अटक केलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) सचिन वाझे यांचा थेट रिपोर्ट परमबीर सिंह यांना होता. जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओच्या जप्तीनंतर, परंबीर सिंह यांनीच हा तपास वाझेच्या स्वाधीन केला होता. परमबीर सिंह यांना सध्या होमगार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

NIA विचारु शकते हे 7 सवाल

  1. 16 वर्षे सस्पेंड राहिल्यानंतर सचिन वाझेला कोणत्या आधारावर पुन्हा घेण्यात आले?
  2. क्राइम ब्रांचमध्ये अनेक सीनियर असूनही वाझेलाच CIU चे हेड का बनवले?
  3. प्रोटोकॉल नियम मोडून वाझे परमबीर सिंह यांना थेट रिपोर्ट का करत होते?
  4. ते जॉइन झाल्यानंतर तुम्ही सर्व महत्त्वाची कामे त्यांना का सोपवली?
  5. एक असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर असुनही वाझेवर तुम्हाला कधी संशय आला नाही का?
  6. अँटिलिया प्रकरणात माहिती मिळाल्यानंतर न्यायालयीन अधिकार नसतानाही वाझेला चौकशी का सोपवली गेली?
  7. सचिन वाझ यांना विशेष शक्ती देण्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीवर दबाव होता का?

वाझेच्या सीक्रेट पार्टनरची सीक्रेट डायरी मिळाली
NIA ने सचिन वाझेची सीक्रेट पार्टनर मीना जॉर्जविषयी नवा खुलासा केला आहे. तिच्या घरुन जप्त केलेल्या सीक्रेट डायरीमधून माहिती मिळाली आहे की, तिचे आणि सचिन वाझेचे अनेक बँकांमध्ये जॉइंट अकाउंट होते. यामधून एक बँकमधून त्यांनी 18 मार्चला म्हणजेच वाझेच्या अटकेच्या काही दिवसांनंतर 26 लाख रुपये काढले होते. NIA च्या तपासात समोर आले आहे की, हे पैसे घेऊन मिरा फरार होण्याच्या तयारीत होती.

मीनाने मुंबईतील वर्सोवा येथील डीसीबी बँकेतून हे पैसे काढले. बँकेच्या कर्मचार्‍यांच्या जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये याची पुष्टी झाली आहे. याच बँकेत वाझे आणि मीनाचे जॉइंट अकाउंट होते. सूत्रांनुसार डायरीमध्ये असे लिहिले आहे की पैसे कोठून आले आणि पैसे कोठे वापरायचे? एवढेच नाही तर हे पैसे कोणाला पाठवायचे याचा तपशीलही डायरीत नोंदवला आहे. एनआयएने मीना यांच्या घरातून अनेक पासबुक व व्यवहार स्लिपही जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...