आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणावरुन अटकेत असलेला मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे संबंधित दररोज नवनवीन खुलासे समारे येत आहे. एनआयएच्या नवीन खुलासानुसार, सचिन वाझेच्या बँक खात्यात 1.5 कोटी रुपये असल्याचे आढळले आहे. एनआयए या संबंधी चौकशी करीत असून एवढे पैसे कोठून व कसे आले याचा तपास करणार आहे. त्यामुळे वाझेच्या कोठडीत वाढ होण्याची मागणीदेखील राष्ट्रीय तपास यंत्रना करत आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात म्हटले की, वाझेनी स्वत:ला प्रामाणिक असल्याचा दावा केला होता. परंतु, एका सहाय्यक पोलिस निरिक्षकांकडे इतका पैसा मिळाल्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणाचा दावा फेटाळण्यात काही गैर नाही.
मनसुख हिरेनही अँटिलिया प्रकरणात सामील होता
न्यायालयात अनिल सिंह यांनी सांगितले की, या संबंधित प्रकरणातील सुरुवातीच्या तपासणीत मनसुख हिरेनही स्कॉर्पियोमध्ये जिलेटिन कांड्या ठेवण्याच्या प्रकरणात सामील होता. परंतु, वाझे यांनी दावा केला आहे की, त्याने स्वत:हून गाडीची चावी मला दिली होती. एनआयएच्या दाव्यानुसार, मनसुख हिरेन पैशाच्या लोभापायी त्याचा भागीदार बनला.
मनसुख सर्वात कमकुवत दुवा झाला होता
एनआयएच्या दाव्यानुसार, मनसुख हिरेन सततच्या चौकशीमुळे अस्वस्थ झाला होता व या प्रकरणातील सर्वात कमकुवत दुवा बनला होता. त्यामुळे सचिन वाझे यांनी तारीख 2 व 3 रोजी मनसुख हिरेनला आपल्या रस्त्यामधून हटविण्याचा विचार केला. त्यानुसार विनायक शिंदे आणि अन्य लोकांना सोबत घेऊन तारीख 4 मार्चला मध्यरात्री त्यांची हत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.