आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरणात CCTV तून खुलासा:सचिन वाझे आणि मनसुख 17 फेब्रुवारीला CST स्टेशनच्या बाहेर भेटले; तपास यंत्रणेला संशय - मनसुखने तेव्हाच स्कॉर्पियोची चावी वाझेंना दिली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसुख हिरेनच्या स्कॉर्पियोमध्ये स्फोटके ठेवून ती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती
  • 5 मार्चला मनसुखचा मृतदेह खाडीमध्ये सापडला होता, तपास यंत्रणांना संशय - मुंबई पोलिसचे निलंबित API सचिन वाझेनी हत्या घडवली

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कड्या जोडणारे एक CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसतेय की, 17 फेब्रुवारीला वाझे आणि मनसुख यांची भेट झाली होती. CCTV फुटेज CST रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे आहे. आता तपास यंत्रणांनुसार, या भेटीदरम्यानच मनसुखने स्कॉर्पियोची चावी वाझेला सोपवली होती.

17 फेब्रुवारीलाच मनसुखने स्कॉर्पियो चोरी करण्यात तक्रार दिली होती. ही तीच स्कॉर्पियो होती. ज्यामध्ये स्फोटके ठेवून मुकेश अबानींचे घर अँटिलिया समोर पार्क करण्यात आली होती.

सध्या जे CCTV फुटेज समोर आले आहे त्यामध्ये दिसतेय की, एक पांढऱ्या रंकाची कार CST रेल्वे स्टेशनबाहेर थांबते. कारमधून मनसुख हिरेन उतरतो. तर दुसऱ्या फुटेजमध्ये सचिन वाझेची निळ्या रंगाची ऑडी दिसत आहे. जी ट्रॅफिक सिग्नलवर थांबते आणि ज्यामध्ये मनसुख हिरेन बसतो.

वाझे या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे पुरावे सापडले
NIA च्या सूत्रांनुसार या अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या षडयंत्रात सचिन वाझेच मुख्य सूत्रधार होता असे पुरावे सापडले आहेत. ही गाडी 25 फेब्रुवारीच्या रात्री मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आली होती. ज्यामध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या होत्या. या स्कॉर्पियोमागे जी इनोव्हा कार CCTV मध्ये दिसली होती. ती क्राइम इन्वेस्टिगेशन यूनिट (CIU) ची होती आणि ही गाडी CIU चा पोलिस चालवत होता. NIA च्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, वाझेच स्कॉर्पियो चालवत घेऊन गेला आणि ती पार्क केल्यानंतर इनोव्हामध्ये बसून फरार झाला.

वाझे म्हणाला होता - जेव्हा मनसुख बेपत्ता झाला तेव्हा तो डोंगरीत होता
वाझेने आपल्या जामिन अर्जात लिहिले होते की, त्याला फसवण्यासाठी FIR दाखल करण्यात आला. मनसुख हिरेन जेव्हा बेपत्ता झाला आणि त्याची कथितरित्या हत्या करण्यात आली, त्यावेळी तो दक्षिण मुंबईच्या डोंगरीमध्ये होता. अटकेच्या एक दिवस आधी सचिन वाझेने 12 मार्च रोजी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये वाझेंनी म्हटले होते की, महाराष्ट्र ATS द्वारे दाखल करण्यात आलेला FIR आधारहीन आणि उद्देशहीन आहे. FIR मध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही. मात्र तेव्हा न्यायालयाने त्यांच्या अर्जावर निर्णय दिला नव्हता.

पुरावे मिटवण्यासाठी मनसुखला रस्त्यातून हटवले
ATS संबंधित सूत्रांनुसार अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो पार्क करण्याचा कट वाझेनी रचला होता. त्याच्या या षडयंत्राचा प्रमुख साक्षीदार मनसुख होता. मनसुखने वाझेला या संपूर्ण कटात मदतही केली होती. या प्रकरणाचा तपास NIA ला सोपवण्यात आला तेव्हा वाझेने रहस्य उलगडण्याच्या भीतीने अजून एक कट रचला. त्याने मनसुखच्या हत्येचा कट रचला आणि 4 मार्चच्या रात्री जवळपास 8.30 वाजता सस्पेंड शिपाई विनायक शिंदेंच्या माध्यमातून मनसुखला बोलावले.

हात-तोंड बांधून जिवंत खाडीमध्ये फेकले होते
5 मार्चला मुंब्राच्या रेती बंदर येथील खाडीमध्ये मनसुखचा मृतदेह सापडला होता. सूत्रांच्या माहितीनुसार मनसुखचे तोंड आणि हात बांधून त्याला जिवंत खाडीमध्ये फेकण्यात आले होते. ATS च्या पहिले NIA ला मनसुख हत्येचे महत्त्वाचे पुरावे सापडले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मनसुख प्रकरणाचा तपास NIA ला सोपवण्याच्या काही तासांमध्येच ATS दोन लोकांना अटक करुन हे प्रकरण सोडवल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...