आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:मिठी नदीत सापडलेली नंबर प्लेट जालन्यातील चोरी झालेल्या कारची, अँटिलिया प्रकरणात याच्या कनेक्शनचा तपास सुरू

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊत म्हणाले- वाझेंविषयी मी इशारा दिला होता

अँटिलिया प्रकरणात तपास करत असलेली राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपास हातात आल्यानंतर अॅक्शन मोडमध्ये आहे. रविवारी टीमने मुंबईच्या मिठी नदीतून एक कम्प्यूटर हार्ड डिस्क, DVR, CD, एका गाडीच्या दोन नंबर प्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतली आहेत. आता या नंबर प्लेटविषयी नवीन खुलासा झाला आहे.

NIA ला माहिती मिळाली आहे की, ही नंबर प्लेट राज्याचे समाज कल्याण विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असलेले आणि जालना येथे राहणाऱ्या विनय नाडे यांच्या चोरी झालेल्या 'मारुती इको' कारची आहे. ही कार औरंगाबादेतून चोरी झाली होती आणि ही गहाळ झाल्याचा रिपोर्ट 20 नोव्हेंबर 2020 ला औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. आता या कारशी API सचिन वाझे किंवा या कटात सहभाही असलेल्याचा संबंध होता का, की प्रकरण भरकटवण्यासाठी याचा वापर केला जात आहे याचा तपास आता NIA करत आहे.

कार मालकाने काय म्हटले
नंबर प्लेटचा फोटो समोर आल्यानंतर विनय यांनी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, MH-20-FP-1539 T नंबरची त्यांची कार 16 नोव्हेंबर 2020 ला चोरी झाली होती. त्यांनी याचा FIR दाखल केला होता. FIR ची कॉपीही हे सोबत घेऊन आले होते.

CFSL पुराव्यांचा करत आहे तपास
मिठी नदीमध्ये मिळालेल्या पुराव्यांचा तपास पुण्यातून आलेली CFSL टीम करत आहे. NIA चे अधिकारी सस्पेंड करण्यात आलेले असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर सचिन वाझेंची चौकशी करत आहे. ही चौकशी वाझेचा सहकारी दोषी विनायक शिंदे याच्या समोर बसून केली जात आहे. याआधी एनआयएकडून दोन वेळा बुकी नरेश गौड आणि शिंदे यांच्यासमोर बसून चौकशी केली गेली होती. वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात आहे.

संजय राऊत म्हणाले- वाझेंविषयी मी इशारा दिला होता
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले की, पोलिसात सचिन वाझेला पुन्हा बसवण्याची योजना आखली जात असताना, मी काही नेत्यांना सांगितले होते की त्यांचे वागणे व काम करण्याच्या पध्दतीने सरकारला अडचणी निर्माण करू शकते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंचे समर्थन केले होते का, या प्रश्नावर राऊत म्हणाले की, वाझे आणि त्याच्या कामांविषयी मुख्यमंत्र्यांना पुरेशी माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...