आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रनेच्या हाती काही नवीन पुरावे लागले आहे. हे पुरावे मुंबई पोलिसांतील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या वसूली व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती एनआयएने दिली. एनआयएच्या माहितीनुसार, या डायरीमध्ये मुंबईतील पोलिस-प्रशासनातील मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांना कोट्यवधी दिले होते. एनआयएने गिरगाव येथील एका क्लबमध्ये टाकलेल्या छापेमारीदरम्यान यांच्या व्यवहाराचे काही कागदपत्रे मिळाले आहे.
एनआयच्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार, त्या डायरीमध्ये कोणाला किती रुपये मिळाले त्याचे नाव आणि देय रक्कम लिहलेली असून त्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. ही लाचेची रक्कम असून यामध्ये दोन पोलिस निरिक्षक, एक पोलिस उपायुक्त आणि एक माजी उपायुक्त स्तरांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रनेने यापूर्वी त्या तिघांची चौकशी केली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रना सीबीआय आणि ईडीकडे पुरावे देऊ शकते
सुत्रांच्या माहितीनुसार, एनआयए संबंधित प्रकरणाचे पुरावे सीबीआय आणि ईडीकडे सामायिक करु शकते. ज्या क्लबवर ही छापेमारी टाकण्यात आली होती त्या मालकालादेखील चौकशीसाठी बोलावले आहे. तपासणीत हे समोर आले आहे की, वाझेचं या क्लब नेहमीचे येणे-जाणे होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.