आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिल‍िया प्रकरण:तळोजा तुरूंगात अटक असलेल्या सचिन वाझेची मुंबई पोलिस दलातून हकालपट्टी; मनसुखच्या हत्येचाही आहे आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 मार्च रोजी मनूखचा मृतदेह मुंब्राच्या रेती बंदर येथे असलेल्या खाडीमध्ये सापडला.

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तळोजा तुरंगात अटकेत असलेला मुंबई पोलिसांतील सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेची मुंबई पोलिसांतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या या आदेशाची पुष्टी केली आहे.

संबंधित प्रकरणात एनआयएने सचिन वाझेला 31 मार्च रोजी संशयित भूमिकेच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांच्यावर कलम 311 (2) नुसार खटला चालवला जाणार आहे. सचिन वाझे यांच्या विरोधात वाझे यांच्याविरुध्द भादंवि कलम 285, 465, 473, 506(2), 120 B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी मनसुखला मारले
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्याचा कट सचिन वाझेचा होता. त्याच्या या कटातील मुख्य साक्षीदार मनसुख होता. या संपूर्ण कटात मनसुखनेही वाझेला मदत केली होती. जेव्हा या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला तेव्हा वाझेने हे रहस्य उघडण्याच्या भीतीने आणखी एक कटकारस्थान रचले. त्याने मनसुखला ठार मारण्याची योजना आखली. 4 मार्चला रात्री 8.30 वाजता निलंबित सैनिक विनायक शिंदे मार्फत मनसुखला बोलावण्यात आले.

हात-तोंड बांधून जिवंतच खाडीत फेकले
5 मार्च रोजी मनूखचा मृतदेह मुंब्राच्या रेती बंदर येथे असलेल्या खाडीमध्ये सापडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसुखच्या तोंडाला आणि हातांना बांधून जिवंत खाडीत फेकण्यात आले. ATS पूर्वी NIA ला मनसुख हत्येचे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने मनसुख प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपवल्याच्या काही तासातच एटीएसने दोन जणांना अटक केली आणि प्रकरण निकाली काढल्याचा दावा केला.

बातम्या आणखी आहेत...