आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरणात नवा खुलासा:सचिन वाझेंसाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 25 लाख रुपयांमध्ये 100 दिवसांसाठी खोली होती बूक

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटेलची खोली लपण्यासाठी बुक केली होती

100 कोटी रुपये जमा करण्याचा आरोप असलेले आणि अँटिलिया प्रकरणात अटक केलेले API सचिन वाझेंसंबंधीत दररोज नवीन खुलासे होते आहेत. ताज्या माहितीत अशी माहिती समोर आली आहे की सचिन वाझे यांच्यासाठी मुंबईतील सोने व्यावसायिकाने 25 लाख रुपयांमध्ये 100 दिवसांसाठी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये खोली बूक केलेली होती. या खोलीचे रोजचे भाडे 10 हजार रुपये होते.

केंद्रीय तपास यंत्रणेला हॉटेलमधून अनेक पुरावे मिळाले आहेत. यामध्ये CCTV फुटेज, बुकिंग रेकॉर्ड आणि स्टाफच्या जबाबाचा समावेश आहे. NIA च्या तपासात समोर आले आहे की, सचिन वाझेंसाठी मुंबईच्या एका ट्रॅव्हल एजेंटने सोन्याच्या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरुन 19 व्या मजल्यावर खोली क्रमांक 1964 बुक केला होता. आयडी प्रुफमध्ये हॉटेलला वाझेंचे बनावट आधारकार्ड देण्यात आले होते. यामध्ये वाझेंचे नाव सुशांत सदाशिव खामकर होते. या प्रकरणी खोली बुक करणाऱ्या व्यापाऱ्यासोबत NIA च्या टीमने आज चौकशी केली आहे.

हॉटेलमध्ये 13 लाखांची रोकड भरली
NIA च्या चौकशीत या व्यावसायिकाने सांगितले की, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या दोन प्रलंबित खटल्यांमध्ये मला फसवण्याची धमकी सचिन वाझेंनी दिली होती. मुंबईतील एलटी नगर आणि कांजूरमार्ग पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याने खोली बुक केली तर त्याला या प्रकरणातून बाहेर काढेल असे वाझेंनी त्याला म्हटले होते. 25 लाखांपैकी 13 लाख रुपये हॉटेलला रोख ट्रॅव्हल एजंटने दिल्याचेही समोर आले आहे.

हॉटेलची खोली लपण्यासाठी बुक केली होती
NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात आपल्याला लपावे लागेल अशी भीती त्याला वाटत होती. म्हणून त्याने ही तयारी आधीपासूनच केली होती. नरिमन पॉईंटवरील हॉटेलच्या रूममध्ये शोध पथकाला फारसे काही सापडले नाही, परंतु कर्मचार्‍यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की काही लोक वाझेंना भेटायला आले होते. वाझे 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंत येथे थांबले होते. NIA ने येथून 35 कॅमेऱ्यांचे फुटेज हस्तगत केले आहे.

वाझेंनी 3 हॉटेलचे पर्याय दिले होते
सचिन वाझे यांनी ताज, ट्रायडंट आणि ओबेरॉय यांना मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेलची नावे दिल्याचे तपासात समोर आले आहे. नंतर वाझेंनी हॉटेल ट्रायडंटची निवड केली. तिन्ही हॉटेल वाझे यांच्या कार्यालयाजवळच होती.

100 कोटी रुपये गोळा करून गृहमंत्र्यांना देण्याचा आरोप
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयातही संपर्क साधला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...