आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन वाझे प्रकरण:दुसऱ्या दिवशीही बैठकींचे सत्र सुरुच, मुख्यमंत्र्यांची प्रमुख मंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक; मंत्रीमंडळात फेरबदल होणार?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझे प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुखही अडचणीत आले आहेत.

मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेरुन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे. मंत्रीमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पूर्णविराम देत मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच अधिकाऱ्यांच्या बदल्याही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब आणि जयंत पाटीलही उपस्थित आहेत. सूत्रांनुसार, बैठकीमध्ये भाजपकडून सलग सरकारला कोंटीत पकडल्या जाण्याच्या प्रयत्नांवर रणनिती आखण्यात येत आहे.

या बैठकीनंततर सरकार डॅमेज कंट्रोलसाठी पोलिसांच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांची बदली करु शकते. ज्यामध्ये सर्वात पहिले मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव समोर येऊ शकते. या बैठकीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा देखील आहेत.

सोमवारी शरद पवारांनी बोलावली होती बैठक

वाझे प्रकरणामुळे गृहमंत्री अनिल देशमुखही अडचणीत आले आहेत. यामुळे सोमवारी सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची दोन-तीन तास खलबते चालली. तत्पूर्वी, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

बारामती येथे रविवारी बोलताना वाझे यांची अटक हा ‘स्थानिक’ मुद्दा असल्याचे सांगून भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता. मात्र सोमवारी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री देशमुख यांची ‘परीक्षा’ घेतली. मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या नावाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीनंतर पुन्हा शरद पवार यांनी वाझे प्रकरणावर निवडक मंत्र्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. विशेष म्हणजे, या स्वतंत्र बैठकीस गृहमंत्री देशमुख अनुपस्थित होते, हे विशेष त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...