आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅटेलिया प्रकरण:मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 6 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी, नजकैदेत राहण्याची परवानगी देऊ नये एनआयएची मागणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना न्यायालयाने गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे. मुंबईतील खंडणी प्रकरणावरून त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. वाझे यांना 10 दिवसांची गुन्हे शाखेची कोठडी देण्यात यावी अशी मागणी गुन्हे शाखेने केली होती. यावर विचार करत न्यायालयाने 6 दिवसांची गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास एनआयएने विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली आहे.

सचिन वाझेंवर मनसुख हिरेनच्या हत्येचा आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचा आरोप आहे. त्यामुळे वाझे यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये. अशी मागणी एनआयएने न्यायालयात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...