आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांचा समाचार:सचिन वझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन वझेंकडे नक्कीच असे काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि सरकारला घालवूही शकतात

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान सभागृहात मनसुख हिरेन प्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढल्याची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी पत्रकार परिषद घेत याविषयावर भाष्य केले. तसेच सचिन वझे हे ओसामा बिन लादेन असल्यासारखे वातावरण तयार केले जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आता यावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सचिन वझेंच्या निलंबनाची मागणी करत आहोत. मात्र ठाकरे सरकावर यावर निर्णय घेत नसल्याचे दिसतेय. सचिन वझेंसाठी वकिलाची गरज नाही, त्यासाठी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसरा वकील नेमण्याची गरज नाही. त्यांच्याविरूद्ध एवढे पुरावे आहेत, अशा व्यक्तीला मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

वझेंकडे नक्कीच असे काहीतरी आहे

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो आणि सचिन वझेंचा बचाव केला जात आहे. संजय राठोड सरकार घालवू शकत नाहीत. मात्र एपीआय सचिन वझेंकडे नक्कीच असे काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि सरकारला घालवूही शकतात', असा आरोप फडणवीसांनी केला. तसेच 'सचिन वझे हे शिवसेनेचे प्रवक्ते होते. त्यांचा उपयोग होईल, म्हणून त्यांना पोलिस दलात घेण्यात आले. तो उपयोग कुठे होतो, हे आता दिसते आहे' असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आत्महत्या, मृत्यू झाल्यावर दखल घेणे हे सरकारचे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नावेही लिहिलेली आहेत. जिलेटीन कांड्या सापडल्याचा तपास करणे सुरू आहे. आधी फाशी द्या मग तपास करा याला अर्थ नाही. अशी सरकारची पद्धत नसते. अजून एक नवीन पद्धत आहे, टार्गेट करायचे आणि चारित्र्यहनन करायचे, हे आम्ही नाही करणार. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, 'एवढे होऊनही मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची दखल आम्ही घेतली आहे. सचिन वझे म्हणजे, ओसामा बिन लादेन असल्यासारखे चित्र निर्माण केले जात आहे. पण जो सापडेल त्याला दया माया दाखवली जाणार नाही.' सचिन वझे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

बातम्या आणखी आहेत...