आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सीसीटीव्हीमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेने 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियासमोर स्कॉर्पिओ उभी करताना त्यामध्ये धमकीचे पत्र ठेवायला विसरले होते. परंतु, काही वेळानंतर त्याच्या लक्षात आल्यावर त्याने इनोव्हा गाडीने परत येऊन त्यामध्ये पत्र ठेवले. हा सगळा प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे हाती मोठे पुरावे लागले असून यामुळे सचिन वाझेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
एनआयए सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व घडामोडीमध्ये सचिन वाझे एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातकैद झाला. त्यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा सैल कुर्ता-पायजामा घातलेला होता. दरम्यान सचिन वाझेने ठेवलेल्या पत्रात असे लिहले होते की, 'प्रिय नीता भाभी आणि मुकेश भैय्या आणि कुटुंबीय, हे फक्त ट्रेलर आहे. पुढच्यावेळी आपल्या कुटुंबियांजवळ उड्डाण भरण्यासाठी पुरेसा सामान असेल. काळजी घ्या.'
पुरावा तयार करण्यासाठी त्या 'सीन'ला रिक्रिएट केले गेले
गेल्या आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी सचिन वाझेकडून काही सीन रिक्रिएट केले होते. ज्यामध्ये त्याला मध्यरात्री घटनास्थळावर सैल कुर्ता-पायजामा घालून स्कॉर्पिओपर्यंत चालवले होते.
एनआयएला अजून वाझेच्या तीन गाड्यांचा शोध
राष्ट्रीय तपास यंत्रणा सचिन वाझे यांनी आरोप करताना वापरलेल्या गाड्यांच्या शोधात आहे. यामध्ये एक 'ऑउटलँडर' गाडी आहे. यापुर्वी एनआयएने पाच गाड्या आणि महाराष्ट एटीएसने एक गाडी जप्त केली होती. एटीएसने जप्त केलेल्या गाड्यांचा तपशील राष्ट्रीय तपास यंत्रणेला सोपवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.