आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया आणि मनसुख हत्या केस:दोन्ही प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेले सिमकार्ड एकाच फॅक्ट्रीतील कर्मचाऱ्यांच्या नावावर, गुजरातमधून एकास अटक

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथका (ATS)ने दमणमधून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे.

यापूर्वी सोमवारीही एटीएस पथकाने अहमदाबादमधून एक व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्यानेच वाझे, शिंदे आणि नरेश गौर यांना 11 सिमकार्ड पुरवले होते, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले. यामधील एक सिमवरून 4 मार्चला रात्री 8.30 वाजता मनसुख यांना व्हाट्सअप कॉल करण्यात आला होता.

एका फॅक्ट्रीतील काही कर्मचाऱ्यांच्या नावे आहेत सिम कार्ड
ATS पथकाच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हत्येमध्ये वापरण्यात आलेले सिमकार्ड अहमदाबादच्या एका फॅक्ट्रीत काम करणाऱ्या काही लोकांच्या नावावर आहेत. या फॅक्ट्रीने 30-40 कर्मचाऱ्यांना सिमकार्ड सुविधा दिलेली आहे. तपासात आढळून आले आहे की, या सिमकार्डचा वापर मनसुख हत्या आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करण्यासाठी केला गेला आहे.

मुंबई ATS आणि गुजरात पोलिसांचे पथक अहमदाबाद, पालनपूर आणि कच्छच्या बोदकदेवमध्ये छापेमारी करून फॅक्टरीतपर्यंत पोहोचले. अटक करण्यात आलेली व्यक्ती फॅक्ट्रीचा मालक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु ATSने अजून याची पुष्टी केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...