आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:ATS ला संशय - 'सचिन वाझेंनी स्फोटकांच्या कटात मनसुख यांचाही केला होता समावेश, रहस्य समोर येण्याच्या भीतीने त्यांची हत्या केली'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण सोडवल्याचा दावा करत दहशतवादविरोधी पथकाने (ATS ) 2 जणांना अटक केली आहे. त्यातील एक मुंबई पोलिसांचा निलंबित कॉन्स्टेबल आहे तर दुसरा क्रिकेट बुकी आहे. कोर्टाने या दोघांना 30 मार्चपर्यंत ATS कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासात ATS सचिन वाझे यांना या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानत आहे.

ATS पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, मनसुख हिरेन खून प्रकरणात निलंबित कॉन्स्टेबल विनायक बाळासाहेब शिंदे ( 51) आणि क्रिकेट बुकी नरेश रमणिकलाल गोरे (31) यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी CIU चे निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह मनसुखच्या हत्येमध्ये सामील होते.

आणखी काही लोकांना अटक करण्याची शक्यता
मनसुखची पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरून ATS ने खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, मनसुखची हत्या झाली तेव्हा सचिन वाझे घटनास्थळी नव्हते, असेही तपासात उघड झाले आहे. या हत्येमध्ये अजुन काही लोकांचा सहभाग असल्याचा पुरावा एटीएसलाही सापडला आहे, त्यातील काही पोलिस असू शकतात. त्यामुळे लवकरच या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक केली जाऊ शकते.

पुरावे मिटवण्यासाठी मनसुख यांना रस्त्यातून हटवले
ATS च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटांनी भरलेल्या स्कॉर्पिओला अंबानीच्या घराबाहेर पार्क करण्याचा कट सचिन वाझे यांनी रचला होता. मनसुख हा या कटातील मुख्य साक्षीदार होता. या संपूर्ण कटात मनसुख यांनीही वाझे यांना मदत केली. जेव्हा या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आला तेव्हा हे रहस्य उघडण्याच्या भीतीने वाझे यांनी आणखी एक कारस्थान रचले. त्याने मनसुखला ठार मारण्याची योजना आखली. निलंबित सैनिक विनायक शिंदे यांच्यामार्फत 4 मार्च रोजी रात्री8.30 वाजता मनसुख यांना बोलावण्यात आले.

हात आणि तोंड बांधून खाडीत जिवंत फेकले
5 मार्च रोजी मनसुखचा मृतदेह मुंब्राच्या रेती बंदर येथे असलेल्या खाडी (समुद्र) मध्ये सापडला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसुखच्या तोंडाला आणि हातांना बांधून खाडीत जिवंत फेकण्यात आले होते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने मनसुख प्रकरणाची चौकशी NIA कडे सोपवल्याच्या काही तासातच ATS ने दोन जणांना अटक करून प्रकरण सोडवल्याचा दावा केला.

वाझेंनी मनसुखलाही या कटात सामिल केले होते
सूत्रांनुसार, वाझेंनी आपल्या कटामध्ये मनसुखला सामिल केले होते. याचे पुरावे ATS आणि NIA ला सापडले होते. मात्र जोपर्यंत ATS सचिन वाझेंची चौकशी करत नाही तोपर्यंत ते या गोष्टीची पुष्टी करु सकत नाही. मनसुख हिरेन हे भीतीमुळे वाझेंसोबत होते की, स्वतःच्या मर्जीने होते हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या दोघांमधील संपर्काचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. मनसुखचे वकील आणि त्यांच्या कुटुंबाचा जबाबही या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा आहे.

मनसुखने 18 फेब्रुवारी रोजी विक्रोळी पोलिस ठाण्यात आपली स्कॉर्पिओ चोरीची तक्रार दाखल केली होती. स्कॉर्पिओ अजिबात चोरीला गेला नसल्याचे NIA च्या फॉरेन्सिक तपासणीत समोर आले आहे. वाझे यांच्या कटात मनसुख व्यतिरिक्त CIU च्या इतर दोन लोकांचा हात असल्याचा संशय आहे. वाझेंच्या विनंतीवरूनच मनसुख यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याचेही उघड झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...