आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुकेश अंबानी यांचे घर अँटिलियापासून काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात अटक करण्यात आलेले आणि मनसुख हिरेनच्या हत्येच्या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेशी जवळीक असलेले मुंबईतील टॉप एन्काउंटर पोलिस सचिन वाझे यांनाही हे समजले आहे. अटकेच्या आधी व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलेल्या स्टेटसमध्येही निराशा दिसून आली. ज्यामध्ये त्यांनी आत्महत्येचे संकेतही दिले होते.
सर्व्हिसमध्ये असतानाही शिवसेनेच्या जवळ होते
सचिन वाझेंचे करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असले तरीही एकेकाळी ते महाराष्ट्रातील पावरफूल व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंचे जवळचे व्यक्ती होते. पक्षातील काही लोकांनी सांगितले की, त्या दरम्यान वाझेंच्या शिवसेना प्रवेशामुळे आम्हाला आश्चर्य वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा सचिन वाझेंनी केलेल्या कारवाईचे सार्वजनिकरित्या कौतुक केले. नोकरीवरुन सस्पेंड झाल्यानंतर सचिन वाझेंना दोन वेळा म्हणजेच 2005 आणि 2007 मध्ये पुन्हा पोलिस डिपार्टमेंटमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला आहे की, वाझेंना पुन्हा आणण्यासाठी शिवसेनेचे नेते सतत दबाव वाढवत होते. मात्र असे करुनही जेव्हा पोलिस फोर्समध्ये वाझेंची एंट्री झाली नाही तेव्हा 2008 मध्ये त्यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेत प्रवेश केला.
20 वर्षांपूर्वी आपल्या जन्मभूमीसोबतचे नाते तोडले होते
49 वर्षांपूर्वी पूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापुरात सचिन वाझे यांचा जन्म झाला. 1990 पूर्वीपर्यंत याच शहरात ते मोठे झाले. येथे त्यांचे कॉलेजच्या काळातील मित्र आणि नातेवाईकही आहेत. शहरातील जुन्या शिवाजी पेठ भागात त्याचे वडिलोपार्जित घर असून त्यावर अनेकदा कुलूपच दिसते. जेव्हा दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा लोकांना वाटले की कदाचित ते परत येतील, परंतु त्यावेळी तसे झाले नव्हते. एका शेजाऱ्याने सांगितले शेवटच्या वेळी ते जवळपास 20 वर्षांपूर्वी येथे आले होते. दरम्यान, मुंबईत राहणारा त्यांचा भाऊ येथे येतो आणि घर स्वच्छ करून परततो.
राजकारण्यांपासून तर पत्रकारांमध्ये प्रसिद्ध होते वाझे
सचिन वाझे हे 1990 मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग गडचिरोलीच्या माओवाद प्रभावित भागात झाली. दोन वर्षांनंतर त्यांना ठाणे शहर पोलिसात हलवण्यात आले होते. 63 हून अधिक एन्काउंटर करुनही सचिन वाझे यांच्या कॉलरवर एकही डाग नव्हता. मुन्ना नेपाळीसारख्या कुख्यात गुंडाचा बंदोबस्त केल्यानंतर ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. ते राजकारणापासून ते पत्रकारांपर्यंत खूप लोकप्रिय झाले होते. अनेक वर्ष ठाण्यात पोस्टिंग केल्यामुळे तिथले सर्व पत्रकार त्यांना चांगले ओळखत होते.
एका पत्रकाराच्या तक्रारीवर वाझेंना मिळाली होती क्राइम ब्रांचमध्ये पोस्टिंग
असे बोलले जाते की, सचिन वाझेंना क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) मध्ये सर्वात पहिले आणणाऱे प्रदीप शर्माच होते. शर्मा तेव्हा CIU चे इंचार्ज होते. त्यांचे पत्रकारांसोबत चांगले संबंध होते आणि एका पत्रकाराच्या सांगण्यावरुनच वाझेंना येथे आणण्यात आले. यानंतर सचिन वाझे प्रदीप शर्मांच्या खूप जवळ झाले आणि त्यांच्या टीमचे दया नायक आणि त्यांच्यात स्पर्धा वाढत गेली. दोघांमध्ये एकेकाळी सर्वात जास्त एन्काउंटर करण्याची स्पर्धाच सुरू झाली होती.
कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाने बदलले वाझेंचे आयुष्य
सलग प्रसिद्धीत राहणाऱ्या वाझेंचे आयुष्य एका प्रकरणाने पूर्णपणे बदलले. ख्वाजा यूनुसचा कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूचे हे प्रकरण होते. 2 डिसेंबर 2002 ला घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एक ब्लास्ट झाला. यामध्ये 2 लोकांचा मृत्यू आणि 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. मुंबई पोलिसांचे तत्कालिन कमिश्नर एम.एन सिंह यांनी वाझेंना या प्रकरणाच्या तपास टीमध्ये सामिल केले आणि त्यांनी डॉ. मतीन, मुजम्मिल, जहीर आणि ख्वाजा यूनुसला POTA(प्रिव्हेंशन ऑफ टेररिज्म अॅक्ट 2002) अंतर्गत अटक केली होती.
सचिन वाझेंकडून सांगण्यात आले की, मुंबई ते औरंगाबाद जात असताना ख्वाजा यूनुस हा फरार झाला. नंतर डॉ. मतीन यांनी आपल्या जबाबात सांगितले होते की, यूनुसला लॉकअपमध्ये वाईट पद्धतीने मारहाण करण्यात आली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. इंजीनिअर असलेल्या यूनुसच्या आईने वाझेंसह चार पोलिसांविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला आणि वाझेंना अटक झाली. वाझेंना निलंबितही व्हावे लागले आणि आजही हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
निलंबिद झाल्यानंतर सचिन वाझेंनी बनवल्या तीन IT कंपन्या
या प्रकरणात नाव आल्यानंतर 3 मार्च 2004 ला न्यायालयाच्या आदेशावर सचिन वाझे आणि कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांना निलंबित करण्यात आले. शिवसेनेशी संबंधित असेलेले सचिन वाझे अनेक वर्षांपर्यंत पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करत होते. मात्र आता शिवसेनेचे नेते म्हणतात की, ते कधी पक्षामध्ये सक्रिय नव्हते. शिवसेनेसोबतच्या संबंधांसह वाझे यांनी डिजीनेक्स्ट मल्टीमीडिया, मल्टीबिल्ड इंफ्राप्रोजेक्ट्स आणि टेकलीगल सॉल्यूशन नावाच्या तीन IT कंपन्याही स्थापन केल्या. दोन कंपन्या या कॉर्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालय (MCA) ने बंद केल्या होत्या. तर डिजीनेक्स्ट मल्टीमीडिया अजुनही सक्रिय कंपनीच्या रुपात काम करत आहे. असे म्हटले जाते की, सचिन वाझेंनी आपल्या या कंपनीच्या माध्यमातून खूप पैसा कमावला. ते अजुनही या कंपनीचे डायरेक्टर आहेत.
16 वर्षांनंतर अशा प्रकारे सचिन वाझेंची मुंबई पोलिसांत झाली पुन्हा एंट्री
वाझेंना 7 जून 2020 ला मुंबई पोलिसा परत आणण्याचा निर्णय एका रिव्ह्यू कमिटीद्वारे घेण्यात आला. या दरम्यान म्हटले होते की, कोविडमुळे मुंबई पोलिस दलाला जास्त पोलिसांची आवश्यकता आहे. या रिव्ह्यू कमिटीचे प्रमुख परमवीर सिंह होते. पोलिस दला पुन्हा एकदा सहभागी करुन घेतलेले वाझे हे पहिले अधिकारी नाही. यापूर्वीही परमवीर सिंह ठाण्याचे पोलिस कमिश्नर होते, तेव्हाही त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये प्रदीप शर्मांना अँटी एक्सटॉर्शन सेलमध्ये परत ठेवले होते. प्रदीप शर्मांनाही बनावट एन्काउंटर प्रकरणात पोलिस विभागातून निलंबित करण्यात आले होते. नंतर शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
CIU मध्ये अँट्रीसह सोपवले सर्व महत्त्वाची प्रकरणे
6 जून 2020 ला वाझेंची पहिली पोस्टिंग नयागांव पोलिस हेडक्वार्टरमध्ये जालीआणि काही दिवसांमध्ये त्यांना क्राइम इंटेलिजेंस शाखेत पाठवण्यात आले. येथे आल्यावर TRP केसमध्ये अर्णब गोस्वामींची अटक, अन्वय नाइक आत्महत्या, स्पोर्ट्स कार घोटाळ्यात दिलीप छाबडियांची केस आणि बॉलिवूड टीव्ही इंडस्ट्रीचे कास्टिंग काउच रॅकेट केस वाझेंना सापवण्यात आले होते.
सामाजिक समरसतेसाठी अनेक कामे केली
1992 मध्ये सचिन वाझे यांना ठाणे पोलिसांकडून मुंब्रा येथे हलवण्यात आले. मुस्लिम बहुल क्षेत्र असूनही, त्यांनी लवकरच तेथील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. मुंब्रामध्ये अनेक वेळा हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता असे म्हणतात. आजही तेथील लोक त्यांना खूप मानतात. अनेक वेळा दोन्हीही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ते दिसले आहेत.
बालपणीच्या मित्राने सांगितले - घाणेरड्या राजकाराणाचे बळी ठरले वाझे
वाझेंसोबत क्रिकेट खेळून मोठे झालेले त्यांचि मित्र रहीम खान त्यांच्या अटकेवरुन खूप दुःखी आहेत, ते म्हणतात...
दोन मोठ्या प्रकरणामध्ये अडकताना दिसत आहेत सचिन वाझे
NIA सूत्रांनुसार सचिन वाझे 25 फेब्रुवारी 2021 ला कारमाइकल रोड (मुकेश अंबानींचे घर अँटिलिया जवळ) स्फोटक भरलेली स्कॉर्पिओ उभी करणाऱ्या लोकांमध्ये सामिल आहेत. सूत्रांनुसार वाझेंनी या प्रकरणातील त्यांच्या सहभागाची कबूलीही दिली आहे. मात्र अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ही स्कॉर्पिओ मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या बाहेर उभी होती. गाडीचा मालक म्हणून ठाण्यातील एक ऑटो पार्ट्स डीलर मनसुख हिरेन यांचे नावही समोर आले होते. त्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली होती की, जी कार मुकेश अंबानींच्या घराबाहेर उभी होती, ती या घटनेपूर्वी चोरी झाली होती. यानंतर 5 मार्च 2021 ला मनसुख हिरेन मुंबईच्या नाल्यामध्ये मृत आढळले होते. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेनने पतीच्या हत्येमागेर सचिन वाझेंचा हात असल्याचे सांगितले आहे. विमला हिरेन यांनी दावा केला आहे की, पतीने नोव्हेंबरमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना SUV दिली होती. जी त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच परत केली होती. महाराष्ट्र ATS नेही या प्रकरणात हत्येची केस दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.