आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मंत्री अब्दुल सत्तार यांची 24 तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.
अहवाल मागवला - चाकणकर
महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणे हे योग्य नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र पाठविले असून या प्रकरणात अहवाल महिला आयोगाला पाठवा, अशा सूचना दिल्या आहेत.
महेश तपासे म्हणाले, विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध आहे.
हा महिलांचा अपमान
खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
वक्तव्य योग्य नाही - केसरकर
शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर म्हणाले, सत्तारांना ज्या काही सुचना द्यायच्या आहेत त्या मुख्यमंत्री देतील. हे वक्तव्य चुकून आले की, हेतूपुरस्पर हे माहित नाही. रागातून वक्तव्य आले असावे पण असे वक्तव्य योग्य नाही. त्यांनी वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आता हे प्रकरण संपवावे.
सत्तारांना चूक कळाली- शितल म्हात्रे
कुठल्याही क्षेत्रातील महिलांचा आदर राखायला हवा. अब्दुल सत्तारांनी वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील असो की कुठल्याही क्षेत्रातील बोलणारे कुणीही असो महिलांचा आदर राखायला हवा. अब्दुल सत्तारांना चुक कळाली असेल म्हणूनच त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.