आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच बलेस्टिक चाचणीत पिस्तूलातून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले होते पण तो गोळीबार सदा सरवणकर यांनी केला नव्हता या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहचले आहेत. त्यामुळे सदा सरवणकर यांना एकप्रकारे क्लिनचिट दिली आहे.
काय आहे प्रकरण?
दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे समोर आला होता. त्यातून उफाळलेल्या वादातून आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सदा सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येते होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान पिस्तूलची बलेस्टिक चाचणीही करण्यात आली होती. त्यात पिस्तूलातून गोळीबार झाल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले होते.
तपासातून निष्कर्ष
या प्रकरणावर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यात सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचे म्हटले आहे. अर्थातच त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून हा निष्कर्ष निघालेला आहे.
काय होता बलेस्टिक अहवाल?
या प्रकरणाचा बॅलेस्टिक अहवाल न्याय सहायक विज्ञान प्रयोगशाळेतून आला होता. त्यामध्ये बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचा अहवाल देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीनचीट दिलेली आहे. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला पण तो त्यांनी स्वतः केला नसल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. या तपासाची माहिती विधानसभेतसुद्धा पाठवण्यात आली आहे.
अपडेट्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.