आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोत यांचा सरकारला इशारा:...तर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार पडणार! किरीट सोमय्या प्रकरणावरून सदाभाऊ खोत यांचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल असा धमकीवजा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?
भाजप नेते किरीट सोमय्या यांची बाजू सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखायला राष्ट्रवादी पक्षाच्या गुंडांकडून खुली धमकी देण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत आहात काय? असा सवालही खोत यांनी उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांच्या केसाला जरी धक्का लागला तर दुसऱ्याच दिवशी हे सरकार बरखास्त होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे पुरावे गोळा करण्यासाठी मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कारखान्यावर जाणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या कोल्हापुरात आले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी करत जमावबंदीचे आदेश जारी केले होते.

बातम्या आणखी आहेत...