आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई:साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सुमारे चार तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने अटक केली. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

माजी मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतजमिनीवर तीन मजली साई रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानंतर परब यांची ईडीने चौकशीही केली होती. या चौकशीदरम्यानच या प्रकरणातील सदानंद कदम यांचे कनेक्शन समोर आले. ईडीने शुक्रवारी सकाळी कदम यांना दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे चार तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने कदम यांना अटक केली. या अटकेची शक्यता सोमय्या यांनी शुक्रवारी सकाळी व्यक्त केली होती. दुसरीकडे, परब यांनीही सोमय्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी विधान परिषदेत सोमय्या आणि म्हाडाच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.