आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. काल ताब्यात घेत जवळपास 4 चौकशी केल्यानंतर त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
दरम्यान ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रुपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार ही रक्कम सदानंद कदम यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला असला, तरी सुद्धा 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.
नेमके प्रकरण काय?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली होती.
कदमांचे कनेक्शन काय?
रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून, अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक केल्याचे म्हटले.
आमदारांनी केला आरोप
साई रिसॉर्ट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोलीचे आमदार संजय कदम यांनीही रामदास कदम यांच्यावर आरोप केले होते. कदम म्हणाले होते की, साई रिसॉर्ट हे अनिल परबांचे नाही. तर ते रामदास कदम यांचा भाऊ सदानंद कदम यांचे आहे. रामदास कदम हे काय आहेत, हे जनतेला माहित आहे. जे सख्ख्या भावाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार असा टोलाही हाणला होता.
संबंधित वृत्त वाचा
साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई:साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सुमारे चार तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने अटक केली. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.