आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर:उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पाटण्यात सदिच्छा भेट घेणार

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी (ता.२३) एक दिवसाच्या पाटणा (बिहार) दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पाटण्यात सदिच्छा भेट घेणार आहेत. या दौऱ्यात आदित्य यांच्यासमवेत खासदार अनिल देसाई व राज्यसभेच्या खा. प्रियांका चतुर्वेदी बिहारला जातील.

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राहणाऱ्या बिहारी मतदारांना आपलेसे करण्यासोबत नव्या दमाच्या व तरूण नेत्यांसमवेत संपर्क वाढवण्यासाठी ते बिहार दौऱ्यावर जात असल्याचे बोलले जाते. फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबई मनपा निवडणूक होण्याची शक्यता असून, हिंदी पट्ट्यातील मुंबईत राहणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी आदित्य बिहारमध्ये जाऊन तेजस्वी यादव यांची भेट घऊन बेरजेचे राजकारण करत असल्याचे मानले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...