आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सन्मान:सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार संजय आवटे यांना जाहीर, 13 जानेवारीला छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

संगमनेर/मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्लोबल टीचर डिसले यांना अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार, अॅड. माधवराव कानवडे यांचाही सन्मान

लेखक, राजकीय विश्लेषक व दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांना २०२०चा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीचे निमंत्रक आमदार डॉ. सुधीर तांबे व बाजीराव पाटील खेमनर यांनी गुरुवारी संगमनेर येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते हा पुरस्कार १३ जानेवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच धवलक्रांतीचे प्रणेते माजी केंद्रीय मंत्री डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांना, तर आदर्श सहकार-सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार थोरात कारखान्याचे माजी चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे यांना पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

पुरस्कार समितीचे सदस्य प्रा. बाबा खरात, केशवराव जाधव यावेळी उपस्थित होते. उल्हास लाटकर, प्रा. बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, विजयअण्णा बोराडे, उत्कर्षाताई रूपवते, डॉ. राजीव शिंदे यांनी ही निवड केली.पुरस्कार प्रदान सोहळा बुधवार, १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. संजय आवटे २० वर्षे पत्रकारितेत असून त्यांची “गेम ऑफ थ्रोन्स’, “वी- द चेंज -आम्ही भारताचे लोक’, “बराक ओबामा - बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’, “पाकिस्तान - लष्करी सत्तेचे अर्थरंग’ आदी पुस्तके गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे गुजराती व इतर भाषेत अनुवादही झाले आहेत.

सहकारातील दीपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, समाजसेवा, पत्रकार, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींसाठी दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser