आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच आरोपपत्र सादर केले पण या आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख नाही. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण ज्याप्रमाणे आरोप केले त्यानुसार, तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का? याचा मात्र, उलगडा होऊ शकला झाला नाही.
ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकते
अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. यात उद्योजक सदानंद कदम, दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे आणि इतर चौघांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. अनिल पबर यांनी बेकायदेशीररित्या साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप ईडीने केला होता. परंतु आरोपपत्रात मात्र अनिल परब यांचा उल्लेख केलेला नाही. दरम्यान आमचा तपास सुरु असून या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकतो, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. आरोपपत्रात माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेख नसला तरीही अद्याप ईडीचा तपास सुरुच आहे.
काय आहे प्रकरण?
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात येत आहे
किरीट सोमय्यांकडून पाठपुरावा
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्याविरोधात आरोप केले होते. साई रिसाॅर्ट पाडण्यासाठी त्यांनी आंदोलनात्मक पावित्राही घेतला होता. त्यांनी या प्रकरणात आपला पाठपुरावा सुरुच ठेवला होता. त्यानंतर त्यांनी 31 डिसेंबर रोजीच ट्विट करत ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची यादी जाहीर केली होती. या नेत्यांवर नव्या वर्षात मोठी कारवाई होणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर आज अनिल परब यांच्यावर पहिली कारवाई झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.