आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा इशारा:म्हणाले- मंदीरावरील भोंगे उतरवून दाखवाच, अशी कारवाई करणारे अजित पवार पहिले दुर्दैवी हिंदु

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोंग्याचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदु मंदिरावरील भोंगे उतरवून दाखवा असे आव्हान अजित पवार यांना दिले असून मंदीरावली भोंगे उतरवणारे हे पहिले दुर्दैवी हिंदु असतील असेही वक्तव्य केले आहे.

राज्यात भोंगा प्रकरणावरून रणकंदन सुरु असतानाच राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत पुन्हा चिथावणीखोर भाषण केले, त्यावर अनेक नेत्यांनी प्रखर टीका केली. त्यानंतर अजित पवारांनी नाशिक येथे आपल्या भाषणात राज यांचा खरपूस समाचार घेतला होता. राज योगींची स्तुती करीत आहेत पण योगींनी मंदीरावरीलही भोंगे काढले आहेत असे वक्तव्य केले होते.

अजित पवारांनी शिर्डीच्या साईबाबा मंदीरावरील भोंगे उतरावे लागतील असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा समाचार नारायण राणे यांनी घेत एक ट्विट करून टीका केली आहे.

काय म्हणाले नारायण राणे

''उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत, की शिर्डी मंदिरावरचा भोंगाही उतरवावा लागेल. हिंदू मंदिरावरील भोंगे, हरिनाम सप्ताह, जागरण-गोंधळ, काकड आरती यांवर कारवाई करून दाखवाच. अशी कारवाई करणारा पहिला हिंदू असेल, हे आमचे दुर्दैव!''

बातम्या आणखी आहेत...