आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''एकनाथ शिंदेंच्या कृत्यामुळे बाळासाहेबांना वेदना होत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सरकार पाडण्यासाठी भाजपची कुटनिती होत आहे. भाजपचा गाजर दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला बळी पडू नका एकनाथ शिंदे घरी परत या.'' अशी भावनिक साद शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घातली. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
शिंदेंचे कृत्य आत्मक्लेश देणारे
पेडणेकर म्हणाल्या की, संयमी नैतृत्व शांत, सर्वांना मान सन्मान देणारे नैतृत्व उद्धव ठाकरेंचे आहे. पण ज्या पद्धतीने कालपासून ड्रामा झाला तो आत्मक्लेश देणारा आहे. आम्ही कोणताही आनंद बाळासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन साजरा करतो पण आज दुःखाची बाब आहे ही सुद्धा बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होताना लाईटही मिचमिच करीत होता म्हणजेच बाळासाहेबांनाही वेदना होत आहेत हे तूम्ही समजून घ्या अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
आम्ही धक्के पचवत आलोय
आम्ही अनेक धक्के पचवत आलो आहेत. आधी छगन भुजबळ नंतर नारायण राणे असे दर दहा वर्षांनी आमच्या वाटेला दुःख येत आहेत. बाळासाहेबांना झालेले दुःख उद्धव ठाकरेंसारख्या संयमी नेत्याच्या वाटेला यावे याचे वाईट वाटते.
पेडणेकरांच्या डोळ्यात आसवांचा पूर
एकनाथ शिंदेंंच्या कृत्यानंतर पेडणेकर यांच्या डोळ्यात आसवांचा पूर होता, त्यांना गहीवरुनही आले. जड अंतकरणाने त्या माध्यमासमोर व्यक्त झाल्या. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदेंना सांगण्याएवढी मी मोठी नाही. शिवसेनेवर आज संकट आले असे नाही तर ही भाजपची कुटनिती आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधातील सरकार पाडायचा डाव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या कामाची चुणुक दाखवली त्यांच्यावर अनेक आरोपही लावले गेले पण त्यांनी त्यांच्या कामातून उत्तर दिले असेही त्या म्हणाल्या.
अस्तित्व हरवू नका, बळी पडू नका
पेडणेकर म्हणाल्या की, एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी कुटनितीला बळी पडू नये. ते धनुष्यबाणाची शान आहे त्यांनी आपले अस्तीत्व हरवु नये. उद्धव ठाकरे, आदीत्य ठाकरे हिंदुत्व पुढे नेत आहेत. गेली चार महिने सरकारला अस्थीर करण्याचे प्रयत्न होत आहेत. आज आमच्या घरातील व्यक्तीलाच घेरण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत.
घरी वापस या
शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिंदेंसाठी चांगला निर्णय घेतील, सैनिक म्हणून त्यांनी घरी परतावे अशी भावनिक सादही त्यांनी घातली. शिंदे मोठे आणि प्रमुख नेते आहेत, त्यांच्यासोबत पक्षाअंतर्गत चर्चाही केली जात होती. ते समजदार नेते आहेत समस्या प्रश्न घरात सोडवू आपलेच घर आहे त्यांनी वापस यावे असे पेडणेकर म्हणाल्या.
तुम्ही मुख्यमंत्री व्हा
पेडणेकर म्हणाल्या का? उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा झाली. तुम्हाला मुख्यमंत्री पद हवे असेल तर घ्या पण आधी घरी वापस यावे अशी मी त्यांना करण्यात आली आहे. तुमचे योगदान शिवसेनेत मोठे आहे, ते असे वाया जाऊ देऊ नका असेही ठाकरे म्हणाल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.