आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी अखेर केला 'तो' खुलासा..:''राजकारणात मी अपघाताने आलो! माझे पहिले पॅशन फिल्म मेकिंग''

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''राजकारणात मी अपघाताने आलो, माझे पहिले पॅशन फिल्म मेकिंग आहे. याच दृष्टिकोनातून मी चित्रपट पाहतो. आपल्या देशात निवडणुका एक धंदा झाला आहे, त्यामुळे त्यातून चित्रपटाच्या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.

एका चित्रपटाचा ट्रेलर मुंबईच्या जुहूतील एका हाॅटेलमध्ये आज लाॅन्च झाला. या ट्रेलरचे लाॅंन्चिंग राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज झाले. त्यावेळी राज ठाकरेंनी भाष्य केले.

इतक्यात हिमंत होत नाहीये

शिवाजी महाराजांवर आत्ताच एवढे चित्रपट आले की, आता सिनेमा काढण्याची इतक्यात हिंमत होत नाही. काॅलेजमध्ये असताना मी गांधी चित्रपट पाहताना वाटत होते की, शिवरायांवर चित्रपट तयार करायला हवे . आता माझे काम सुरु आहे तीन भागात माझी फिल्म येईल.

बऱ्याच त्रुटी असतात

मराठी चित्रपट फार घाई गडबडीने तयार केले जातात. स्क्रिन प्ले नावाची गोष्ट नसते बऱ्याच त्रुटी असतात पण हे सरसकट म्हणता येणार नाही.'' असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राजकारण ही आपली पहिली चाॅईस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे त्यांचा कलेविषयीचा लळा यानिमित्ताने समोर आला आहे.

खूप विचित्र विषय

राज ठाकरे म्हणाले, ओटीटी प्लॅटफार्मची सेन्सारशिप हा खूप विचित्र विषय आहे. तुम्ही काय दाखवणार आहात आणि त्याचा संबंध त्या सीरीजशी आहे का नाही हे तपासायला हवे. माझ्या मित्राने एक सीरीज लावली होती, त्यात व्याकरणापुरते मराठी होते उर्वरीत शिव्याच होत्या.

अजून लोकशाही रुजायचीय

राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे इतक्या वर्षांनंतरही लोकशाही रुजायचीय. गरज किंवा आवश्यकता असेल तर चित्रपटावर, सीरीजची गरज असेल तर बंधने येता कामा नये. मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरीज लोकापर्यंत पोहचत नाही. यावर राज ठाकरे म्हणाले की, मी थोडा माझा चित्रपटाविषयाचा अंदाज देतो. माझ्याघरी ड्रोबो मशिन आहे. त्यामध्ये साडे आठ ते पाऊने नऊ हजार चित्रपट आहे.

मराठी सिनेमे घाईत होतात

राज ठाकरे म्हणाले, राजकारणात मी अपघाताने आलो, माझे पहिले पॅशन फिल्म मेकिंग आहे. याच दृष्टिकोनातून मी चित्रपट पाहतो. मराठी चित्रपट फार घाई गडबडीने तयार केले जातात. स्क्रिन प्ले नावाची गोष्ट नसते बऱ्याच त्रुटी असतात पण हे सरसकट म्हणता येणार नाही. बऱ्याच चित्रपटाचे कास्टींग आणि बांधणी उत्तम असते.

तो काळ पुन्हा यावा

राज ठाकरे म्हणाले, चित्रपटात नवीन मुलं आले त्यामुळे त्यांच्याकडून नवीन गोष्टी बघायला मिळतील. त्यामुळे पुन्हा मराठी सिनेमाला सुवर्णकाळ यावा. अमराठी लोक मराठी नाटकाला येऊन हिंदी चित्रपट काढावेत असा काळ यायलाच हवा.

बातम्या आणखी आहेत...