आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची प्रतिक्रीया:म्हणाले- घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक, ही प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृतीच

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांविरूध्द अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केल्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रतिक्रीया आली आहे. पवारांविरुद्ध अशा शब्दात लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीकेची पोस्ट सोशल माध्यमावर केली. यानंतर केतकीवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांचे राजकीय विरोधक असेलेल राज ठाकरे यांनीही शरद पवारांच्या समर्थनार्थ प्रतिक्रीया दिली आहे.

राज ठाकरेंच्या पत्रातील मजकूर

राज ठाकरे यांनी याविषयावर एक पत्रच जारी केले आहे. त्यात त्यांनी नमुद केले की, एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत...! पवारांविरुद्ध अशा शब्दात लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले. हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.

राज ठाकरेंचे पत्र
राज ठाकरेंचे पत्र

अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रात जागा नाही

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असेही पत्रकात नमुद आहे.

नवा वाद उकरुन काढण्याचा प्रयत्न

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा! पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे असेही ठाकरेंनी नमुद केले आहे.

द्वेषाची पातळी खालपर्यंत आली राजकारण्यांनाही समजलंच

अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा असेही त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...