आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनिषा कायंदेंचे नवनीत राणांना प्रत्युत्तर:म्हणाल्या - अंगावर भगवे वस्त्र चढवले आणि हातात हनुमान मूर्ती घेऊन कुणी हिंदूचा नेते होत नाही

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंगावर भगवे वस्त्र चढवले, हातात हनुमान मूर्ती घेतली म्हणजे तू हिंदूंची नेता झाली हा गैरसमज काढ बाई, या शब्दात शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ट्विट करत अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. आज हातामध्ये हनुमानाची गदा घेत दिल्लीतील प्रसिद्ध हनुमान मंदिरात खासदार नवनीत व आमदार नवनीत राणा पोहचले आणि महाआरती करत हनुमान चालिसाचे पठण केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यावर मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मनिषा कायंदे यांनी ट्विट करत म्हटले की, अंगावर भगवे वस्त्र चढवले, हातात हनुमान मूर्ती घेतली म्हणजे तू हिंदूंची नेता झाली हा गैरसमज काढ बाई. ठाकरेंना हिंदुत्व शिकवण्याची हिम्मत करू नको. अन्यथा तू म्हणते तशी यापुढे 14 दिवस नाही तर 14 वर्षे, असे म्हणत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी 'मला तुरुंगात डांबले तरीही मी काही घाबरत नाही. हनुमान चालीसा आणि रामाचे नाव घेणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही तर मी 14 वर्षे जेलमध्ये राहू शकते, असे आव्हान दिले होते.

नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी -

यापूर्वी मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या MRIप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. अति केले का माती होते. तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेरात यावा यासाठी धडपड करत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे हे महाराष्ट्र चांगल्याप्रकारे ओळखतो, असे म्हणत निशाणा साधला होता. तसेच त्यांनी रवी राणा आणि नवनित राणा यांचा बंटी-बबली असा उल्लेख केला होता.

राणा दाम्पत्य दिल्लीतील हनुमान मंदिरात -
हनुमान चालिसा पठण तसेच महाआरती करण्यासाठी राणा दाम्पत्य आज सकाळी 9.30 वाजेदरम्यान दिल्ली येथील त्यांच्या घरापासून पायी हनुमान मंदिरात पोहचले, जे त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी त्यांनी "महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी म्हटले. तसेच हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा असे आव्हान त्यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. मुख्यमंत्र्यांची आज मुंबईत सभा होणार आहे, ते सभेची सुरुवात औरंगजेबाचे नाव घेऊन करणार का? असे म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...