आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री प्राजक्ता माळीची भोंगा वादात उडी:म्हणाली- उद्यापासून गोंगाट बंद होईल, ट्रोल होताच ट्विट केले डिलीट

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री प्राजक्ता माळीने भोंगा वादात उडी घेत एक ट्विट केले, पण या ट्विटवर लगेच प्रतिक्रीय पडल्या आणि ट्रोल होताच तिने ट्विट डिलीट केले. उद्यापासून भोंग्याचा गोंगाट बंद होईल असा आशय ट्विटमध्ये होता.

मनसेने तापविलेला भोंगामुद्द्यावरून राजकारण ढवळून निघाले. यानंतर औरंगाबादेतील सभेतही राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण करून हा मुद्दा पुन्हा तापवला. राज यांच्या भाषणावर पोलिसांकडून कारवाई होत असतानाच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा बाळगते, असे ट्विट केले. पण ट्रोल होताच लगेचच तिने हे ट्विट डिलीट केले आहे.

ट्विट करत दिल्या होत्या शुभेच्छाही

प्राजक्ता माळी हिने आज ट्विट करून आज 3 तारीख उद्यापासुन गोंगाट बंद होईस असे, म्हणत सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मात्र, या ट्विटवरून ती ट्रोल झाली आणि तिने ट्विट लगेचच डिलीट केले.

काय होते प्राजक्ताचे ट्विट

प्राजक्ता आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती की, सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. असो....आज 3 तारिख, उद्यापासून गोंगाट बंद होईल. असा मजकूर ट्विटमध्ये होता.

बातम्या आणखी आहेत...