आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही." अशा जहरी शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी एमआयएमचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. राणे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी अत्यंत जहाल शब्दात महाविकास आघाडीवरही टीका केली.
एमआयएम नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. त्यानंतर त्यांनी खूलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यावरुन त्यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत प्रखर टीका केली.
औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवल्याशिवाय राहणार नाही
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने चोवीस तास उलटूनही अकबरुद्दीन ओवैसींवर कारवाई केली नाही. आमच्या छातीवर तो नाचून गेला पण त्याच्यावर कारवाई केली गेली नाही. हे सर्व लोक आम्हाला चिथावणी देत आहेत. औरंगजेबाने स्वतःच्या आईवडीलांनाही सोडले नाही आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, संभाजी राजांचे अपमान करणाऱ्यांना औरंगजेबाच्या बाजूला झोपवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही वाघ आहोत, सिंह आहोत असे ओवैसी म्हणतात त्यांची ही भाषा आहे आम्ही असेच बोललो असतो तर आम्हाला सरकारने जेलमध्ये टाकले असेही राणे म्हणाले.
नागडा नाचलो तरी नामर्द सरकार कारवाई करणार नाही
''या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यात "नामर्दांचे सरकार आहे'' याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका करीत वाभाडेही काढले.
ट्विटमध्ये काय म्हणाले नितेश राणे
''मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही. या कारट्या ओवेसीला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण राज्यात "नामर्दांचे सरकार आहे'' याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!
हे आहे दोन ट्विट
1)
2)
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय करतेय?-आनंद दवे
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय करते, सर्वच राजकीय मनेते गप्प का असा सवाल हिंदु महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.