आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचा हल्ला:म्हणाले- राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, आता बाबरी पाडल्याबद्दल बोलणे हलकटपणा

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर बाबरी प्रकरणावरून तोफ डागली. संजय राऊतांनी राम मंदीराविरोधात लेख लिहिला होता, त्यांना बाबरी मशिद तोडण्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि ते बोलतच असतील तर तो त्यांच्या हलकटपणाचा कळस आहे अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.

याबाबत राणे यांनी व्हिडिओच ट्विट केला आहे. शिवसेना, संजय राऊत आणि राणे कुटुंबिय यांचे आपसांतील असलेले वैमनस्य सर्वश्रूत आहे. यामुळेच राऊत आणि राणे कुटुंबिय एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही आजही राणे यांनी व्हिडिओ ट्विट केला.

नितेश राणे यांचे ट्विट, म्हणाले तुम्ही कुठे होता?

नितेश राणे म्हणाले, आज सकाळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या बाबरी मशिद तोडण्याच्या मुद्द्यावर टीका केली. राऊतांनी बाबरी मशिद तोडण्यावर बोलणे हलकटपणाचे कळस आहे.

राऊतांनी राम मंदीराच्या विरोधात लेख लिहिला

जेव्हा बाबरी मशिद तोडली तेव्हा सामनाचा पगार घेत होता का सामनामध्ये तरी आला होता का माझ्याकडे राऊतांचा एक लेख आहे. रामाची राजकीय फडफड असा त्यांचा लेख होता.

संजय राऊतांनी २६ एप्रिल १९९२ ला हा लेख लिहिला. हा लेख राममंदीराच्या विरोधात राऊतांनी लिहिला होता. हेच संजय राऊत जर तोंड उघडून बाबरी पाडल्याबद्दल विधान करीत असेल तर खरच हा हलकट पणाचा कळस आहे अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...