आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता देशातील मोठा राजकीय पक्ष आपल्या सोबत आहे. ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत, आपला निर्णय योग्य आणि ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले असून आमदारांनो आता फक्त एकजूट ठेवा. विजय आपलाच आहे असे स्पष्ट करीत भाजपसोबत जाण्याचा आपला पक्का इरादा असल्याचेच आज संकेत दिले आहेत.
गुवाहटीत चाळीसपेक्षा जास्त आमदारांच्या गटासोबत शिवसेनेचे बंडखोर ने्ते एकनाथ शिंदे हाॅटेल रेडीसन ब्लु येथे ठाण मांडून आहेत. त्यांचा एक व्हिडिओ दिव्य मराठीकडे प्राप्त झाला आहे. त्यात त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपसोबत जाण्याचीच भाषा केली आहे.
काय म्हणाले शिंदे?
शिंदे यांनी आमदारांना संबोधित करताना सांगितले की, ''आता आपले सुख आणि दुःख एकच आहे. काही असले तरी एकजूट ठेवा, कितीही संकटे येऊद्या विजय आपलाच आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे, महाशक्ती आहे, ज्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, त्या पक्षाने आपल्याला सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय देशातील ऐतिहासिक निर्णय आहे.
काहीही कमी पडू देणार नाही
शिंदे यांनी आमदारांना हेही सांगितले की, आपल्या मागे त्या राष्ट्रीय पक्षाची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागले तर कधीही कुठे कमी पडणार नाही, याची प्रचिती तूम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा येईल कुठेही काही कमी पडणार नाही असे त्यांनी आपल्याला आश्वासन दिले असेही आमदारांना एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आमदारांनी शिंदेंना बहाल केले अधिकार
प्राप्त व्हिडिओनुसार, सध्या गुवाहटीतील हाॅटेलमध्ये असलेल्या आमदारांनी एकमताने शिंदे यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. आमदारांनी सांगितले की, जोही निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी उपस्थित सर्व आमदार गटनेते एकनाथ शिंदे यांना अधिकार देत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.