आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील सभेत मुख्यमंत्री कडाडले:म्हणाले- आमची पंचवीस वर्षे युतीत सडली, तुमचा भाजप तरी अटलजींचा राहीला काय?

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने पाठीत खंजिर खूपसला हे भाजपवाले म्हणातात, पण मी म्हणतो आमची पंचवीस वर्षे युतीत सडली. आम्ही खोटे-नाटे बोलू शकत नाही. खोटे बोलणे हे भाजपच्याच हिंदुत्वात आहे असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मुंबईतील बिकेसीतील सभेत मुख्यमंत्री बोलत आहेत. ते म्हणाले की, भाजपला लाज नाही, लज्जा नाही. लोकांना भ्रमिष्ट करण्याचे काम भाजप करीत आहे. अटलजी विरोधी पक्षात असताना त्यावेळी देशात पेट्रोलचे दर काही पैशांनी वाढले तेव्हा अटलजींनी बैलगाडीत मोर्चा काढला आणि आता हेच भाजपवाले पेट्रोल दर वाढले म्हणून ओरडतात. तेव्हाचा अटलजीचा भाजप राहीला आहे काय असाही सवाल त्यांनी केला

भाजपचे लोक मनोरुग्ण

आता हे भाजपवाले उत्तर सभा घेणार आहेत. उत्तर द्यायचे असतील तर जनता महागाईने होरपळली त्याला उत्तर द्या, भाजपने डोक्यात ​भगव्या टोप्या घातल्या पण मेंदूत हिंदुत्व असावे लागते. टोपे ​​​​​भाजपचे लोक मनोरुग् आहेत ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला असेल तर विश्वास कुणावर टाकायचा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमचा सकाळचा शपथविधी चोरासारखा

आम्ही काॅंग्रेससोबत गेलो नव्हे भाजपनेच आम्हाला ढकलले. आम्ही काॅंग्रेसमध्ये गेलो तर टीका होते की, आम्ही हिंदुत्व सोडले, पण आम्ही उघड काॅंग्रेसमध्ये उघड गेलो. तुमच्या सारखे सकाळच्या शपथविधीसारखे चोरुन गेलो नाही असेही ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

मुंबईचे बाप आम्हीच- संजय राऊत

''मुंबईचा बाप फक्त शिवसेना असून आमचे बाप शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. ही सभा शिवसेनेच्या आधीच्या शंभर सभांची बरोबरी करणारी असून शिवसेनेकडे बोट दाखवू नका, शायिस्तेखानासारखी छाटू असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

बातम्या आणखी आहेत...