आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या सभेवरुन दानवेंचा टोला:म्हणाले- भाजपविरुद्ध अशा खूप सभा पाहिल्या, उलट आमची ताकद वाढतच राहीली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या मुंबईतील सभेवरुन विरोधर वारंवार टीका करीत असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही सडकून टीका केली. अशा खूप सभा आम्ही पाहिल्या, भाजपविरुद्ध अनेक सभा घेतल्या गेल्या पण आम्हीच देशात आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहोत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील बिकेसी मैदानात सभा होत आहे. या सभेपुर्वी भाजपच्या ट्विटर पेजवरुन शिवसेनेवर टीका झाली. संजय राऊत यांनीही विरोधकांवर शाब्दीक हल्ला चढविला. आता याच शाब्दीक लढाईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या स्टाईने शिवसेनेवर हल्ला चढविला.

नेमके काय म्हणाले रावसाहेब दानवे?

भाजपच्या राजकीय कारकिर्दीत भाजपविरुद्ध सभा घेतल्या गेल्या पण काहीही फरक पडला नाही. आम्ही आधी चाौथ्या क्रमांकावर होतो; पण यांनी कितीही सभा घेतल्या तरी आमचा पहिल्या क्रमांकाच पक्ष आहे. राज्यात, देशात आमचे सर्वात जास्त संख्याबळ आहे असेही दानवे म्हणाले.

कोणत्याच राजकीय व्यक्तीवर अशी टिप्पणी नको

केतकी चितळे हिने शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर दानवेंची प्रतिक्रीया माध्यमांनी जाणून घेतली त्यावेळी रावसाहेब म्हणाले, ''शरद पवार असो की, कोणतीही राजकीय व्यक्ती असो अशा भाषेत टिप्पणी योग्य नाही.'' आज काल कुणीही उठसुठ टिप्पणी करतोय ते योग्य नाही अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांवर केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टसंदर्भात आपली प्रतिक्रीया दिली.