आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालघरमध्ये नौसैनिकाची हत्या:चेन्नईतून किडनॅप केलेल्या नौसैनिकाला जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेव्ही सेलर सुरज दुबे यांनी शुद्धीवर आल्यावर पोलिसांना सर्व प्रकार सांगितला

चेन्नईमधून किडनॅप केलेल्या नौसैनिकाला मुंबईजवळील पालघरमध्ये जिवंक जाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात जखमी नौसैनिकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपासात समोर आले की, किडनॅप केलेल्या नौसैनिकाला परत करण्यासाठी आरोपींनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी पालघर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

30 जानेवारीला केले होते अपहरण

पालघरचे SP दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले की, 27 वर्षीय नेव्ही सेलर सुरज कुमार दुबे झारखंडच्या पलामूचे रहिवासी होते. त्यांची पोस्टिंग कोयंबटूरजवळ INS अग्रणीवर होती. 30 जानेवारीला ते सुट्टीवरुन परतले होते. यादरम्यान चेन्नई विमनतळावरुन रात्री 9 वाजता 3 जणांनी त्यांचे अपहरण केले. 3 दिवस चेन्नईमध्ये ठेवल्यानंतर आरोपींनी त्यांना 1400 किलोमीटर दूर पालघरला आणले. यादरम्यान त्यांनी सुरज यांच्या कुटुंबाकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न मिळाल्यामुळे शुक्रवारी आरोपींनी सुरज यांना पालघरच्या जंगलात नेले आणि हात-पाय बांधुन जिवंत जाळले.

नेव्ही सेलर सुरज दुबे
नेव्ही सेलर सुरज दुबे

जेव्हा आरोपी सुरज यांना जिवंत जाळत होते, तेव्हा एका व्यक्तीने पाहिले आणि गोंधळ केला. यावेळी आरोपींनी सुरज यांना तशाच अवस्थेत टाकून पळ काढला. यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना बोलवल आणि पोलिसांनीच सुरज यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. तिथे शुद्धीवर आल्यावर सुरज यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर, सुरज यांची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मुंबईच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिथे उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...