आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:भाजप ‘आयटी सेल’चा पदाधिकारी चालवत होता निवडणूक आयोगाचा सोशल मीडिया, साकेत गोखलेंचा आरोप

मुंबई, नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय आयोगाने संबंधितांकडून अहवाल मागवला, पृथ्वीराज चव्हाण करणार सखोल चौकशीची मागणी

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाची जबाबदारी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या कंपनीस दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या प्रकरणी चौकशीची मागणी करणार आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचा व माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप काँग्रेसने केला. केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांंच्या काळात प्रत्येक राज्यात कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करते. महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी या कार्यालयाच्या सोशल मीडियाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल हाताळणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीस दिल्याची चर्चा आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेस बाधा निर्माण झाली असून, आयोगाकडील माहितीचाही दुरुपयोग झाला असल्याची तक्रार आहे.

शरण यांच्याकडून दखल

> साकेत गोखले यांच्या या खळबळजनक ट्विटनंतर निवडणूक अायाेगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास याबाबत खुलासा मागितला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आणि सखोल अहवाल मुख्य निवडणूक आयोगास त्वरित पाठवावा, असे शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

> भाजपच्या आयटी सेल सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा सर्व प्रकारचा महत्त्वाचा डेटा गेला असेल तर पार पडलेल्या निवडणुका नि:पक्षपातीपणेच झाल्या होत्या, असे म्हणता येईल काय, असा प्रश्न साकेत गोखले यांनी उपस्थित केला आहे.

बलदेवसिंहांच्या कारकीर्दीतील प्रकरण

जुलै २०१९ मध्ये बलदेवसिंह यांची महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या कारकीर्दीतच हे प्रकरण घडले आहे.

प्रकरणातील गांभीर्य सिद्ध, डेटाच्या सुरक्षिततेचे काय?

निवडणूक आयोगाने याचा तत्काळ अहवाल मागितला यातच यातील गांभीर्य सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने एवढे जबाबदारीचे काम देताना संबंधित कंपनीची पार्श्वभूमी तपासली नाही का, हा माझा पहिला प्रश्न आहे. भाजपचा पदाधिकारी आणि त्याच्या कंपनीला हे काम कसे दिले गेले? यामुळे आयोगाकडील मतदारांचा डेटा भाजपकडे गेला असल्यास आणि त्याचा त्यांनी निवडणुकीत गैरवापर केला असल्यास आयोगाच्या डेटाच्या सुरक्षिततेचे काय, हा आमचा दुसरा प्रश्न आहे. - साकेत गोखले, सामाजिक कार्यकर्ते

ही बाब अतिशय गंभीर : सचिन सावंत

स्वायत्त निवडणूक आयोगाचे काम भाजपचा एखादा पदाधिकारी हाताळत असेल तर हे गंभीर आहे, असे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी नमूद केले.