आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खुलासा:आरोपी 25 दिवसांपासून करत होता महिलेचा पाठलाग, महिलेने दुर्लक्ष केले तर तिच्यावर केले दुष्कर्म

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने डिंडोशी सत्र न्यायालयात 28 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते

मुंबईच्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात 346 पानांच्या आरोपपत्रात उघड झाले आहे की आरोपीने महिलेशी निर्भयासारखे वर्तन केले कारण ती महिला गेल्या 25 दिवसांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. ढिंडोशी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात असा दावा करण्यात आला आहे की, आरोपीची पीडितेशी चांगली ओळख होती. या प्रकरणात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर, मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने डिंडोशी सत्र न्यायालयात 28 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते, त्यातील माहिती आता समोर आली आहे. आरोपपत्रानुसार पोलिसांनी तपासादरम्यान 77 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्या गार्डचा जबाब देखील समाविष्ट आहे ज्याने जखमी अवस्थेत महिलेला पाहून पोलिसांना माहिती दिली होती.

हल्ला करण्यापूर्वी आरोपीने महिलेचा पाठलाग केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर हल्ला करण्यापूर्वी लांब अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला आणि निर्जन ठिकाण पाहिल्यानंतर तिच्यावर दुष्कर्म केले. 10 सप्टेंबर रोजी आरोपीने पिकअप व्हॅनमध्ये 34 वर्षीय महिलेवर प्रथम बलात्कार केला आणि नंतर तिच्या खाजगी भागावर लोखंडी रॉडने हल्ला केला. नंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेला वाचवता आले नाही.

कॉन्स्टेबलने महिलेला दुपारी 3.30 वाजता रुग्णालयात दाखल केले होते
मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले की, 9-10 सप्टेंबरच्या मध्यरात्री 3.20 वाजता एका चौकीदाराने नियंत्रण कक्षाला फोन केला आणि कोणीतरी एका महिलेवर वाईटप्रकारे अत्याचार केल्याचे सांगितले. 10 मिनिटांनंतर साकीनाका पोलिस स्टेशनची एक टीम घटनास्थळी पोहचली आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता एका कॉन्स्टेबलने राजावाडी रुग्णालयात टेम्पो नेऊन त्या महिलेला दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...