आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • Sakinaka Rape Case : File An Indictment Within A Month; Chief Minister's Instructions, Important Instructions To Police Officers For The Safety Of Women In Mumbai

साकिनाका बलात्कार प्रकरण:एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या महत्त्वपूर्ण सूचना

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • हॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने याप्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

साकीनाका येथील घटनेबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले. कुठेही वेळ दवडला नाही तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.

हॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी

 • महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.
 • प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस-रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.
 • स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.
 • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
 • गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच सुरू करावी.
बातम्या आणखी आहेत...