आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानला दिलासा नाही:शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा, निकाल राखून ठेवल्यानंतर उच्च न्यायालय पुन्हा घेणार सुनावणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस शेजारील फार्महाऊसचे मालक केतन कक्कड यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. कालच न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, या दाव्यावर ज्यांनी सुनावणी घेतली ते न्यायमूर्ती निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता अन्य न्यायमूर्ती पुन्हा नव्याने सलमान खानच्या दाव्यावरील सुनावणी घेणार आहेत.

या प्रकरणात न्या. सी. व्ही. भडंग यांनी निकाल राखून ठेवला होता. मात्र, ते आता निवृत्त झाल्याने सलमानला कालही या प्रकरणात दिलासा मिळू शकला नाही.

नेमके प्रकरण काय?

सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊस येथील शेजारी केतन कक्कड यांनी सोशल मीडियावर आपली बदनामी केली, असा आरोप सलमान खानने केला आहे. कक्कड यांनी ही पोस्ट डिलिट करावी, यासाठी सलमानने खानने यापूर्वी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाने सलमान खानची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालायने ही याचिका दाखल करुन घेत 1 ऑगस्ट 2022 पासून सुनावणीस सुरुवात केली.

सलमानविरोधात पुरावे

सलमान खानने आपल्या याचिकेत मागणी केली आहे की, केतन कक्कड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कक्कड यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. सलमान खानविरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा युक्तिवाद केतन कक्कड यांच्यावतीने करण्यात आला आहे.

जमिनीवरुन वाद

पनवेलच्या फार्महाऊस परिसरातील जमिनीच्या वादाबाबात शेजारी केतन कक्कड यांनी समाज माध्यमावर बदनामीकारक पोस्ट टाकली. त्यांना अशी पोस्ट टाकण्यास मनाई करावी तसेच पोस्ट डिलीट करण्यात यावे, अशी मागणी सलमान खानने केली आहे. तर, आपल्याकडे सलमान खानविरोधात सर्व पुरावे आहेत. त्यामुळे सलमान खानची याचिका फेटाळून लावावी, असे कक्कड यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...