आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादंग:टिकली लावली नाही म्हणून संभाजी भिडे महिला पत्रकारावर भडकले! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात घेतली भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून वादाच्या भोवऱ्यात राहणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बुधवारी (२ नोव्हेंबर) पुन्हा वादंग निर्माण केले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असला, ‘तुझ्या कपाळाला टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही’ असे वक्तव्य करून भिडे यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज दुपारी आले होते. त्यांची भेट झाल्यावर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना घेरले. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. या भेटीबद्दल महिला पत्रकाराने विचारले असता, संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराकडे पाहिले आणि तुझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असा सल्लाही त्यांनी दिला. संभाजी भिडे यांच्या अशा विचित्र उत्तरामुळे महिला पत्रकार गोंधळली. त्यानंतर काही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा तपशील विचारला असता ते चिडले. मी मुख्यमंत्र्यांबरोबर देश व धर्मासंबंधी बोललो. दोघांतील चर्चा पत्रकारांना कशाला सांगू, असे म्हणत त्यांनी मंत्रालयातून काढता पाय घेतला.

बातम्या आणखी आहेत...