आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंची महिला आयोगाकडे विनंती:उत्तर देण्यास मागितला 10 दिवसांचा कालावधी- महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला पत्रकाराने टिकली लावली नाही, म्हणून वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी संभाजी भिडेंना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवले होते. मात्र आता संभाजी भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी 10 दिवसाचा वाढीव अवधी मागितला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हटले की, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा, अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे.

नेमके प्रकरण काय?

काही दिवसापूर्वी संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असला, तुझ्या कपाळाला टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही असे वक्तव्य करून भिडे यांनी पुन्हा वाद ओढवून घेतला आहे.

संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यांची भेट झाल्यावर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना घेरले. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. या भेटीबद्दल महिला पत्रकाराने विचारले असता, संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराकडे पाहिले आणि तुझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असा सल्लाही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...