आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांने खार पोलिस ठाण्यात धडक दिली असून भाजप नेते मोहित कंबोजविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतरही बेकायदेशीरपणे बारमध्ये मद्यपान पार्टी केल्याचा आरोप सचिन कांबळे यांनी केला होता.
छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे यांनी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी खार पोलिस ठाण्यामध्ये गेले होते. जोपर्यंत खार पोलिस मोहित कंबोज विरोधातील तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून बाहेर पडणार नसल्याचा इशारा छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे यांनी दिला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर नाचत होते, याचा तपास करावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा व्हिडिओ टविट केला आहे. यात सचिन कांबळे म्हणताय की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज हे रात्री साडेतीन वाजता लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा करताना दिसून येत आहे.
सचिन कांबळे पुढे व्हिडिओत म्हणताय की, येथे कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आमच्या सभा असल्या की रात्री 10 साडेदहा वाजता सर्व काही बंद करायला लावता. हे मात्र, रात्री साडेतीन वाजेपर्यंत मुलींसोबत नाचू शकतात असा संतप्त सवाल सचिन कांबळेंनी उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे?
महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावे मोगलाई सुरू आहे. भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, असा थेट सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र पाठवून केला आहे.
पुणे पोलिसांनी ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांना रात्री दहा वाजेनंतर कार्यक्रम करू दिला नाही. मात्र, भाजपचा नेता पहाटे साडेतीनपर्यंत बारमध्ये नाचतो. कायदा सर्वांना समान नाही का, भाजपचे नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का, अशा फैरीही राऊत यांनी झाडल्यात.
कंबोज मद्यधुंद अवस्थेत
संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात की, 29 एप्रिल 2023 रोजी पहाटे लिंक रोड, खार पश्चिम येथे घडलेल्या घटनेकडे मी आपले लक्षवेधीत आहे. मुंबईत रेस्टॉरंट द्वार साधारण 1 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर 'रेडिओ' बार पहाटे 3.30 वाजेपर्यंत चालू होता व आतील गाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.