आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत जाऊन वाचाळवीरांचा बाजार उठवू:खासदार उदयनराजेंनी फक्त निर्णय घ्यावा, संभाजी ब्रिगेडचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार उदयनराजेंनी फक्त निर्णय घ्यावा. आम्ही फक्त आझाद मैदान नव्हे तर मुंबईत जाऊन शिवरायांचा अपमान करणाऱ्या वाचाळवीरांचा बाजार उठवू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज व्हिडिओ जारी करत संभाजी ब्रिगेड या मुद्द्यावर उदयनराजेंसोबत आहे, असे स्पष्ट केले.

आता अवमान सहन करणार नाही

संतोष शिंदे म्हणाले की, राज्यात काही जणांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवर अपमान केला जात आहे. आमच्या भावना सातत्याने दुखावल्या जात आहेत. हर हर महादेव चित्रपटातून आमच्या भावना कुरतडण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी शिवरायांबाबत अवमानजनक वक्तव्य केलं. मात्र, आता हा अवमान सहन करणार नाही.

शिवद्रोहींना जागा दाखवण्याची वेळ

संतोष शिंदे म्हणाले की, शिवरायांच्या अवमानाबाबत आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट करूनही हे प्रकरणं थांबलेले नाही. आमच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. याबाबत आता उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेड त्यांच्यासोबत आहे. शिवद्रोहींनी जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे.

आमच्या भावना कुरतडणे सुरू

संतोष शिंदे म्हणाले की, हर हर महादेव चित्रपटात शिवरायांचा आक्षेपार्ह इतिहास दाखवला आहे. महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी आमची मागणी होती. असे असूनही आता हा चित्रपट खासगी वाहीनीतून घराघरात दाखवला जाणार आहे. आमच्या भावना कुरतडण्याचे हे काम सुरू आहे.

शिवरायांचा अवमान जाणीवपूर्वक

संतोष शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जाणीवपूर्वक केला जात आहे. आता कुठल्याही पक्षाच्या बांडगुळांनी शिवरायांचा अपमान केल्यास केवळ आझाद मैदान नव्हे तर मुंबईत जाऊन अशा वाचाळवीरांचा बाजार उठवू, असा इशारा शिंदे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...