आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीनंतर एका निर्णयाच्या माहितीत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यास काँग्रेसने आक्षेप घेत महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात शहरांच्या नामांतराचा अजेंडा नाही, अशी आठवण करून दिली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा संभाजीनगर असा उल्लेख करत काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही हे दाखवून दिले आहे.
सकाळी : संभाजीनगरच्या उल्लेखाचे कारण शोधू : अजित पवार
मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर उल्लेख कसा आला याची शहानिशा करून त्यामागचे कारण शोधू, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी सकाळी स्पष्ट केले. सरकारने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. आघाडी सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो, असे ते म्हणाले.
संध्याकाळी : सीएमआेकडून पुन्हा संभाजीनगरचे ट्वीट
संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन ट्वीट केले. त्यात ते म्हणतात, संभाजीनगरसारख्या मराठवाड्याच्या राजधानीच्या शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. यापुढेही असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील.
सरकारवर परिणाम? : औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा विरोध आहे. अशी नामांतरे काँग्रेसच्या धोरणाशी सुसंगत नाहीत. तरीही मुख्यमंत्र्यांकडून संभाजीनगर उल्लेख करणे सरकारच्या स्थैर्यावर परिणाम करू शकते.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.