आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक यांच्यावर वानखेडेंचा पलटवार:नवाब मलिकांचे आरोप खोटे, मी कधी दुबईला गेलो नाही, एनसीबी प्रमुखांचा पलटवार; मलिकांनी विदेशात जाऊन वसुलीचा केला होता आरोप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) आणखी एक मोठा आरोप केला आहे. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून NCB च्या वसुलीबद्दल ते बोलले आहेत. मलिक यांच्या आरोपावर, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दैनिक भास्करशी विशेष संवाद साधताना सांगितले की, नवाब मलिक खोटे आहेत आणि ते त्यांच्यावर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करतील.

मलिक यांनी वानखेडेंवर हा आरोप केला होता
गुरुवारी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्हिडिओ जारी केला, ज्यात म्हटले आहे की कोरोनाच्या काळात फिल्म इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी मालदीव आणि दुबईमध्ये होते. दरम्यान, NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे कुटुंबीयही या ठिकाणी होते. मलिक यांनी वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे यांचा सोशल मीडिया फोटो देखील प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने वानखेडे यांना विचारले आहे की मालदीव आणि दुबईमध्ये त्यांचे कुटुंबीय काय करत होते आणि या काळात ते स्वतः तेथे होते की नाही? त्यांनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.

नवाब मलिक खोटे बोलले: वानखेडे
कॅबिनेट मंत्री असुन देखील नवाब मलिक स्पष्ट खोटे बोलले. मी माझ्या आयुष्यात कधीच दुबईला गेलो नाही. मलिक आता हे कार्टून नेटवर्क चालवणे बंद करा. मी लवकरच त्याच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. या प्रकारचा इशारा NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिला.

माझ्याकडे खोट्या आरोपांसाठी वेळ नाही
वानखेडे यांनी दैनिक भास्करसोबतच्या विशेष बातचित दरम्यान म्हटले की, नारकोटिक्स संबंधित कारवाईमध्ये मी खूप व्यस्त आहे. माझ्याकडे बिनबुडाचे आणि खोट्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी वेळ नाही. मलिक मंत्री असुनही एक नंबरचे खोटारडे आहेत, कारण ते माझ्या विरोधात सातत्याने निराधार आरोप करत आहेत.

सरकारच्या परवानगीने मी माझ्या खर्चाने गेलो
मालदीवला जाण्याच्या प्रश्नावर, NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले की मी मालदीव सरकारची परवानगी घेतल्यानंतर आणि स्वखर्चाने कुटुंबासोबत गेलो होतो. यासह, त्यांनी असेही सांगितले की जेव्हापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून काही लोक त्यांना भयभीत करून एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मलिक एनसीबीवर एकामागून एक आरोप करत आहेत
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीवर, विशेषत: झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. प्रथम, त्यांनी आर्यन खानवर क्रूड ड्रग्स पार्टी प्रकरणात बनावट पध्दतीने अटक केल्याचा आरोप केला. क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात साक्षीदार बनलेले किरण गोसावी हे वॉन्टेड आणि मनीष भानुशाली हे भाजपचे कार्यकर्ता असल्याचे उघड केले होते.

यानंतर, फ्लेचर पटेल नावाच्या युवकाचा फोटो प्रसिद्ध करताना त्यांनी खुलासा केला की ही व्यक्ती एनसीबीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पंच आहे. मलिक यांनी एनसीबी द्वारे फ्लेचर पटेल यांना इंडिपेंडेंट पंच असल्याचा खोटा दावा करत समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीसह त्यांचा फोटो सार्वजनिक केला होता. एनसीबीने फ्लेचर पटेलला स्वतंत्र पंच म्हणून खोटा दावा केला होता. आता मालदीव आणि दुबईत वसुली होण्याचा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...