आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sameer Wankhede | Nawab Malik | Tweet | 'Kabool Hai ... Sameer Wankhede Yeh Tune Kya Kiya?', Nawab Malik Shared The Photo Of Sameer Wankhede's Marriage At Midnight

नवाब मलिकांचे ट्विट:'कबूल है... समीर वानखेडे ये तुने क्या किया?', नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला समीर वानखेडेंचा निकाहचा फोटो

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे आरोप तसेच खुलासे देखील करत आहे. समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम असून त्यांनी धर्म परिवर्तन करून नोकरी मिळवली असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो आपल्या ट्विटरवर शेअर करत त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे.

नवाब मलिक यांनी मध्यरात्री आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक फोटो ट्विट केले आहे. नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करताना कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, 'कबूल है, कबूल है, कबूल है... याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे असे लिहिले आहे की, 'समीर दाऊद वानखेडे तुम्ही हे काय केले?'

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती आहे. मलिकांच्या मते तो समीर वानखेडे आहे. तो व्यक्ती एका निकाहनाम्यावर सही करताना दिसत आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून, याच दिवशी नवाब मलिक यांनी निकाहनाम्यावर सही करतानाचा समीर वानखेडे यांचा फोटो शेअर केला आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानाचा दावा ठोकला असून, सव्वा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालय आज या प्रकरणी निकाल देऊ शकते. न्यायालयाच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...