आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेंना पाठिंबा:शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा समीर वानखेडेंना पाठिंबा, NCB कार्यालयाबाहेर पुष्पवृष्टी अन् सत्कार करत समर्थनार्थ घोषणाबाजी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खान प्रकरणावरून मुंबईचे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या रडारवर आहे. मात्र आता समीर वानखेडे यांना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेने समर्थन दिले आहे. आज एनसीबीच्या कार्यालयाबाहेर या संघटनेतर्फे वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. सोबत समर्थनार्थच्या घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने समर्थन दिल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर संघटनेच्या वतीने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील भेट देण्यात आली.

"नवाब मलिक हे केवळ एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ड्रग्जच्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या मलिकांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, मलिकांविरोधात ही संघटना आता यापुढेही अशीच आंदोलने करणार" असा इशारा देखील नवाब मलिक यांना देण्यात आला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर टीका करत आहे. आर्यन खानवर झालेली चौकशी ही पुर्णपणे बोगस असून, एनसीबीचे काहीजण त्याला मुद्दामून फसवण्याचे प्रयत्न करत आहेत. अशी थेट टीका मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केली होती. त्यावर आता पुन्हा नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना मलिकांनी फटकारले होते.

मलिक म्हणाले होते की, 'नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल आता माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये थेट जायला मिळायचे. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये याचे जाणे-येणे असायचे. हाच व्यक्ती रश्मी शुक्लाच्या प्रकरणात गोंधळ देखील घालत होता. आणि आता देखील हाच दलाल समीर वानखेडे यांच्या कार्यालयात तासनतास जाऊन बसत आहे.

हा तिथे का जातो तिथे तासनतास का बसतो. याचे कारण मला माहिती आहे. काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ यांचा एकमेकांशी संबंध असून, ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपला राज्यात तोंड दाखवायला देखील लाज वाटेल.' असा शब्दात नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

बातम्या आणखी आहेत...